आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविवाहित तरुणींच्या रक्ताने आंघोळ करायची ही राणी, सर्वाधिक क्रूर \'सिरियल किलर\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
इंटरनॅशनल डेस्क - एलिजाबेथ बाथरीला इतिहासातील सर्वात क्रूर महिला सिरीयल किलर म्हणून ओळखले जाते. तिने 1585 ते 1610 या कालावधीत अनेक तरुणींची हत्या केली होती. तारुण्य कायम राहावे म्हणून या तरुणींच्या रक्ताने ती अंघोळ करायची. यासाठी तिने शेकडो तरुणींची हत्या केल्याचे समोर आले आहे.
 
एलिजाबेथ बाथरी ही हंगेरी साम्राज्यातील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील मुलगी होती. फेरेंक नॅडेस्‍डी नावाच्या व्यक्तीबरोबर तिचा विवाह झाला होता. तुर्कस्तान विरोधातील युद्धामध्ये तो हंगेरीसाठी हिरो ठरलेला होता. तो जिवंत असतानाही एलिजाबेथ अशा प्रकारे तरुणींची हत्या करायची. पण 1604 मध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर तिने कळस गाठला. हत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवले होते. एलिजाबेथ बाथरी स्‍लोव्हानियाच्या चास्चिस येथील महालात राहत होती. त्याचठिकाणी तिने या सर्व हत्या केल्याचे सांगितले जाते.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा - आमीष दाखवून तरुणींना अडकवायची जाळ्यात
बातम्या आणखी आहेत...