आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक! 100 हून अधिक महिलांशी डेट, फक्त बलात्कारीच नव्हे तर सिरीयल किलर आहे हा व्यक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - बारा वर्षीय मुलीच्या हरविल्याचा तपास सुरु असतांना पोलिसांना चक्रावणारी माहिती हाती आली. या मुलीची चौकशी करीत असतांना ती सर्वात शेवटी रॉडनी अॅल्कला याच्याशी बोलल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी यंत्रणांना कामाला लावले. अखेरीस रॉडनी अॅल्कलाच्या संदर्भात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली. तब्बल एक, दोन नव्हे तर 100 महिलांशी या व्यक्ती डेट केली असून 7 जणींचा बलात्कार करून खून केल्याचे समोर आले. मात्र हा आकडा आणखी मोठा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
पोलिस प्रशासनाने सांगितले की, रॉडनी अॅल्कला या मनोरुग्ण दिसणाऱ्या व्यक्तीसोबत बारा वर्षीय मुलगी शेवटचे बोलली होती. एकंदरीत वर्तणावरून रॉडनी चांगला वाटत नव्हता. मग त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये रॉडनीच्या घरात हरवलेल्या मुलीच्या कानातले डूल आणि 100 महिलांचे छायाचित्रे भिंतीला लावल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता त्याचे शंभराहून अधिक महिलांशी शारिरीक संबंध असून त्यापैकी 7 जणींचा खून केल्याचेही निष्पन्न झाले. या आरोपाखाली त्याला दोनवेळा मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र त्याने वरच्या कोर्टात जाऊन मृत्यूदंडाची शिक्षा माफीची मागणी करीत होता. अखेरीस 2010 मध्ये सात खूनांच्या आरोपाखाली त्याला मृत्यूच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अधिकृत अधिकाऱ्याने सांगितले की खूनाचा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - महिलांची छायाचित्रे काढून लावायचा घरात PHOTOS
 
 
बातम्या आणखी आहेत...