आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी जगत होती ग्लॅमर लाईफस्टाईल, या कारणामुळे उचलले रशियाविरुद्ध हत्यार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमीना उकेवा। - Divya Marathi
अमीना उकेवा।
इंटरनॅशनल डेस्क - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या स्नाईपर एडम उकेवाच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे एडम गंभीर जखमी आहे. यूक्रेनच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार एंटोन गेराशचेंको आणि जोरियन शकिरयाक यांनी फेसबुकवर ही माहिती शेअर केली. रशियाच्या विरोधात पतीची साथ दिल्याबद्दल अमीनाला विद्रोही ठरविण्यात आले होते.
 
- यूक्रेनमध्ये जन्मलेली अमीना काही वर्षापूर्वी रशियाच्या विरोधात लढणाऱ्या एडम उकेवाच्या संपर्कात आली होती.
- अमीना यापूर्वी सरळसाधी आणि मॉडर्न लाईफ जगणारी तरुणी होती. ती बऱ्याचवेळा ग्लॅमरस फोटो सोशल साईटवर शेअर करीत असे. 
- मात्र रशियातील मुस्लिम चेचन्या प्रांतात मुस्लिम कम्युनिटीविरोधात रशियन लष्कर अनेकदा अत्याचार करीत असे. त्यामुळे रशियाबद्दल तिच्या मनात खदखद होती.
- त्यामुळे अमीना मुस्लिम विद्रोही गटाशी संबंधित एडमशी ती संपर्कात आली. त्यानंतर तिने रशियाच्या विरोधात हत्यार उचलण्यास सुरुवात केली.
- अमीना वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारे चालविण्यात पारंगत असून दिग्गज स्नाईपर्सपैकी एक आहे.
 
व्लादिमीर पुतीनला मारण्याचा कट
- रशियन अधिकाऱ्यांनुसार एडमने 2012मध्ये सेंट्रल मॉस्कोमध्ये बॉम्बस्फोट घडवून अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मारण्याचा कट रचला होता. मात्र सुरक्षा रक्षकांना या कटाची पूर्वसूचना मिळालेली होती. 
- याव्यतरिक्त दोघांनी युक्रेन सेनेसाठी स्वयंसेवक म्हणून काम केल्याने तेथे त्यांना हिरो मानले जाते.
- मीडिया रिपोर्टनुसार, कीवच्या बाहेरील परिसरात रेल्वे क्रॉसिंग परिसरात अमीना आणि एडमच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अमीनाचा घटनास्थळी मृत्यू झाला.
- यापूर्वी जून महिन्यात एका बंदूकधारी व्यक्तीकडून दोघांवर गोळीबार झाला होता. यात ते थोडक्यात बचावले होते.
 
युक्रेनमध्ये अमीना खरी देशभक्त
- सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमीनाच्या मृत्यूची माहिती मिळताच युक्रेनमध्ये ठिकठिकाणी दु:ख व्यक्त केले जात आहे.
- याव्यतरिक्त युक्रेनचे नागरिक एडमचे प्राण वाचण्यासाठी प्रार्थ्रनाही करताहेत. युक्रेनच्या सोशल माध्यमांत अमीनाला खरी देशभक्त म्हणून संबोधले जात आहे. 
- युक्रेनसह अनेक नाटो देशांत अमीना आणि एडमचे फोटो शेअर केले जात आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा - अमीनाचे वेगवेगळे फोटो
 
 
बातम्या आणखी आहेत...