आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US ने कोरियावरून सोडले सुपरसोनिक बॉम्बर्स, Nkoreaने सांगितले - हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - नॉर्थ कोरियाशी वाढलेल्या तणावादरम्यान अमेरिकेने साऊथ कोरियावरून सुपरसोनिक बॉम्बर्स उडविले. अमेरिकेने जपान आणि साऊथ कोरियाच्या सहकार्याने हे परीक्षण केले. नॉर्थ कोरियाने या बॉम्बर्सच्या तपासणीला ब्लॅकमेलिंग म्हटले आहे. नुकतेच नॉर्थ कोरियाने सहाव्या न्यूक्लीअरचे परीक्षण केले होते. त्यासह इंटरकॉन्टीनेन्टल बॅलेस्टिक मिसाईलचेही परीक्षण केले होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरयाचे शासक किम जोंग यांच्या दरम्यान शाब्दिक चकमक कायम सुरु आहे.
 
अशा प्रकारे झाले हे परीक्षण
- US पॅसिफिक एअरफोर्सने सांगितले की, दोन एअरक्राफ्टने गुआममध्ये एंडरसन एअरफोर्स बेसवरून उड्डाण घेतले. त्यानंतर एअरक्राफ्टने जापान एअर सेल्फ डिफेन्स फायटर्सला सोबत घेतले. त्यानंतर अमेरिकन एअरक्राफ्टने कोरियाच्या फायटर्ससोबत येलो सी परिसरात उड्डाण घेतले. त्यानंतर हे सुपरसोनिक बॉम्बर्स परत अमेरिकेच्या बेसवर परतले.
 
का उचलले हे पाऊल?
- एअरफोर्सने सांगितले की, या परीक्षणाचा आणि वादविवादाचा कुठलाही संबंध नाही. पॅसिफिक परिसरात बॉम्बर्सच्या तपासणीचा एक भाग आहे.
 
अमेरिकेचे हे पाऊल का आहे महत्त्वाचे?
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंतच्या सर्वात लांबलचक आशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते जापान, चीन, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि साऊथ कोरियाला भेटणार आहेत. यादरम्यान आर्थिक आणि राजकीय विषयावर चर्चा करतील.
 
अशी आहे नॉर्थ कोरियाची प्रतिक्रिया
सियोलच्या गुप्तचर एजन्सीनुसार, नॉर्थ कोरियाने आणखी एका परीक्षणाची तयारी पूर्ण केली आहे. प्योंगयांगमध्ये गाड्यांच्या हालचालीवरून ही माहिती समोर आली आहे.
बातम्या आणखी आहेत...