आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS पासून मुक्त झाल्यानंतर या शहरात झाले पहिले लग्न, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सीरियामध्ये इस्लामिक दहशतवादी संघटना ISISच्या भोवऱ्यात अडकून असलेल्या रक्कश शहराने मागील तीन वर्षात अत्यंत वाईट काळ अनुभवला. दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिक मृत्यूमुखी पावले. लाखो लोकांना घर सोडून दुसरीकडे आसरा घ्यावा लागला. तब्बल दोन आठवड्यापूर्वी अमेरिकन लष्कराने ऑपरेशन मोहीम राबवून दहशतवाद्यांपासून या शहराला मुक्त केले. आता लोक पुन्हा शहराकडे परततांना दिसताहेत. मागील शुक्रवारी या शहरात उल्ल्हासाचे वातावरण बघायला मिळाले. इसिसपासून मुक्त झाल्यानंतर या शहरात पहिले लग्न मोठ्या थाटात पार पडले. या लग्नाला मोठ्या संख्येने वऱ्हाडी जमले होते. मोठ्या कालावधीनंतर या शहराच्या रस्त्यावर रोषणाई बघायला मिळाली.
 
इसिसच्या विळख्यात असतांना अशक्य होते लग्नसमारंभ...
 
- अहमद आणि हेबा यांच्या लग्नामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते.
- अहमचचे वडील उथ्मान इब्राहिम यांनी सांगितले की, इसिसचा समूळ खात्मा झाल्यानंतर अहमदचे लग्न ठरविले.
- इब्राहिमने सांगितले की, इसिस आणि लष्करादरम्यान झालेल्या घमासान युद्धादरम्यान त्यांच्या कुटूंबियांनी रक्का सोडले होते.
- मात्र इसिसचे पाळेमुळे येथून नष्ट झाल्याने परिवारासह पुन्हा शहरात परतलो आहोत. त्यांच्यासह शेकडो कुटूंब परत आपल्या शहरात आले आहेत.
 
असे झाले लग्न...
- इसिसचा खात्मा झाल्यानंतर पहिल्यांदाच या शहरातील महिला आणि पुरुषांना आनंदात वावरतांना बघायला मिळाले.
- इसिसच्या राज्यात महिला पूर्णत: बुरख्यात राहत असे. या फंक्शनमध्ये महिला स्कार्फमध्ये मेकअप करून आल्या होत्या.
- या लग्नात 18 वर्षीय वर अहमदने पारंपारिक कोट परिधान केला होता. तर हेबाने पांढऱ्या रंगाचा वेडिंग ड्रेस घतला होता.
- जोडप्यांना पाहण्यासाठी वऱ्हाडींची मोठी गर्दी जमली होती. इसिसमुळे या शहरातील नागरिकांचा आनंद हिरावला गेला होता.
 
इसिसच्या राज्यात नव्हते स्वातंत्र्य
- इसिसच्या काळात नाचणे आणि गाण्यास पूर्णपणे बंदी होती. महिलांसाठी एक ड्रेसकोड होता. त्याशिवाय महिलांच्या मेकअपरवर कायम निर्बंध लावण्यात आले होते.
- इतकेच नव्हे तर समारंभा दरम्यान पुरुष आणि महिलांना एकमेकांना भेटण्यासही बंदी लावण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...