दुबई - जगातील सर्वात लक्झरियस हॉटेल असल्याचा दावा करणाऱ्या दुबईच्या बुर्ज अल अरबने व्हर्च्युअल टूर उपलब्ध करून दिला आहे. लोक आता या हॉटेलमध्ये राहण्याबरोबरच गूगल स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून हॉटेलचा भव्यपणाही अनुभवू शकतात. केवळ एका क्लिकद्वारे हेलिपॅड, लॉबी आणि रॉयल सुईटमधील लक्झरी पाहता येणार आहे. ज्युमिराह ग्रुपने गूगल स्ट्रीट व्ह्यू बरोबर कोलॅब्रेशन केले आहे. त्यामुळे यूजर्सना ज्युमिराह इनसाइडद्वारे हॉटेलच्या आतील हाय रेझोल्युशन व्हिडिओ फुटेज पाहता येणार आहे. हा प्रोग्राम डेस्कटॉप, टॅबलेट आणि मोबाईलवर पाच भाषांमध्ये पाहता येऊ शकेल.
आर्टिफिशियल आयलँडवर बनलेले हे सेव्हन स्टार हॉटेल पाहण्याचा प्रवास लॉबीपासून सुरू होतो. पाहुण्यांना एकापाठोपाठ एका दरवाजानंतर इमारतीच्या मध्यभागापर्यंत पोहोचता येते. त्यांना हॉटेलच्या शानदार रूम्सबरोबर तालिस स्पा, पूल आणि 8395 स्क्वेअर फुटात तयार करण्यात आलेल्या रॉयल सुईटचा व्हर्च्युअली पाहण्याची संधी मिळते. ज्युमिराह इनसाइड हॉटेलचे हेलिपॅड पाहण्याची संधीही मिळते.
ज्युमिराह ग्रुपमध्ये ब्रँडचे ग्रुप व्हाइस प्रेसिडेंट रॉस मॅकऑले म्हणाले की, हे इंटरअॅक्टिव्ह सर्व्हीस ब्रँडचे सर्वात एक्सायटींग डिजिटल डेव्हलपमेंटपैकी एक आहे. आम्ही जगभरातून येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या अपेक्षा पूर्ण करू इच्छितो. आमच्या ग्राहकांना येथे येण्यापूर्वीच येथे असणाऱ्या सुविधांविषयी माहिती मिळावी हा आमचा उद्देश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गूगल स्ट्रीट व्ह्यूद्वारे घेतलेले या लक्झरी हॉटेलचे PHOTOS...