आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 एकरात पसरलाय या युद्धनौकेचा डेक, समोर आले आतील PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग लिजी नावाने प्रसिद्ध असलेली क्वीन एलिजाबेथ ही ब्रिटनची सर्वात मोठी युद्धनौका आहे. - Divya Marathi
बिग लिजी नावाने प्रसिद्ध असलेली क्वीन एलिजाबेथ ही ब्रिटनची सर्वात मोठी युद्धनौका आहे.
इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनची सर्वात मोठी व सर्वात पॉवरफुल वॉरशिप ‘क्वीन एलिजाबेथ’ 700 क्रू मेंबर्ससह प्रथमच आपल्या होम पोर्टवर पोहचत आहे. टेक्नोलॉजीच्या रूपात पाहायचे झाल्यास ही शिप ब्रिटनची आतापर्यंत सर्वात अॅडवान्स्ड वॉरशिप आहे. 3 बिलियन पाउंड खर्च आलेली ही रॉयल नेवी नावाची वॉरशिप 2020 पासून सेवेत दाखल होईल. 4 एकरात पसरलेल्या या शिपच्या डेकमधील आतील फोटोज समोर आले आहेत. रॉयल नेवी 50 वर्षे देईल सेवा....
 
- एचएमएस क्वीन एलिजाबेथ ब्रिटनमध्ये बनणारी सर्वात मोठी वॉरशिप आहे. रॉयल नेवीचे हे शिप 2020 मध्ये ऑपरेशनल होईल.
- आपल्या आधुनिक तंत्रज्ञानासह ही वॉरशिप सुमारे 50 वर्षे नेवीला आपली सेवा देईल.
- ‘बिग लिजी’ नावाने प्रसिद्ध या वॉरशिपचा डेक सुमारे 4 एकरात पसरलेला आहे. तिची लांबी 280 मीटर (920 फूट) आणि वजन 65 हजार टन आहे. 
- इतके जड वजन असूनही ही शिप एका दिवसात 500 मैल (804 किलोमीटर) अंतर आरामात कापू शकते.
- शिपचे कॅप्टन अॅडमिरल जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ही वॉरशिप आपल्या मित्र व शत्रूंना समुद्रात आपली ताकद दाखविताना दिसेल. 

US सोबत मरीन्सचे ट्रेनिंग-
 
- ब्रिटिश रॉयल नेवीचे 60 सेलर्स आणि मरीन्सने या महिन्यात अमेरिकी वॉरशिप USS जॉर्ज बुशसोबत ट्रेनिंगमध्ये सहभाग घेतला. ही मरीन्स क्वीन एलिजाबेथ वॉरशिपमध्ये सेवा देईल. 
- पुढील वर्षी अमेरिकेत होऊ घातलेल्या फ्लाईंग ट्रायल्सनंतर या वॉरशिपमध्ये एयरक्राफ्ट्सला स्थान मिळेल. या ट्रायलमध्ये 120 एयर-क्रू सोबतच 10 एफ-35 फायटर जेट्स सुद्धा सहभाग घेतील. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या वॉरशिपच्या आतील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...