आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात वादग्रस्त तुरुंगापैकी एक, आतून आहे असा नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंअरनॅशनल डेस्क - ग्वांतानामो बे डिटेन्शन सेंटरचे नाव अमेरिकेत सर्वसामान्य आहे. मात्र येथे आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे. टॉर्चर आणि अॅब्यूजच्या प्रकरणातील सर्वात वादग्रस्त तुरुंगात याचा समावेश होतो. याठिकाणी तब्बल 41 टेरेरिज्म संशयित राहताहेत. बेसवर यूएस मिलिट्री अधिकाऱ्यांचा तब्बल 100 पेक्षा अधिक स्टाफ आहे. ज्यांना ही जागा सोडण्याची परवानगी मिळत नाही. 
 
असे फोटो क्लिक करण्याला प्रतिबंध...
- डेबी मिलिट्री एस्कार्टच्या निगरानीखाली सेंटरमध्ये आल्यानंतर तीन वर्षे या तुरुंगातील आयुष्य कॅमेऱ्यात कैद केले.
- ग्वांतानामोमध्ये राहणारे मिलिट्री कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी येथील अनुभव अत्यंत वेगळा असतो. त्यांना बेसमधून बाहेर जाण्यास परवानगी नसते.
- डेबीच्या मते, येथे राहणारे अधिकारी, त्यांचे कुटूंबियांसाठी स्विमींग पूल, प्रायवेट बीच, गोल्फ कोर्स आणि म्यूझिक इन्स्ट्रमेंट आदी सुविधा असतात.
- याठिकाणी दोन पद्धतीची लाईफस्टाईल बघायला मिळते. एकीकडे कैदी, तर दुसरीकडे येथील अधिकाऱ्यांची. 
- फोटोग्राफरने याठिकाणच्या 2014 ते 2015 दरम्यान तीनवेळा ट्रीप केल्या. यादरम्यान त्यांना तुरुंगातील नियम, कायदे आणि सुरक्षेचे लक्ष ठेवावे लागायचे.
- फोटोग्राफरला ग्वांतानामो बे वरील व्यक्तीच्या चेहऱ्याचा फोटो काढण्यास सक्त मनाई होती.
- डेबी जेथे जाई तेथे तिच्यासोबत मिलिट्री एस्कार्ट सोबत असायचा. दररोज काढलेल्या फोटोंचा आढावा घेतला जायचा. नियमात न बसणारे फोटो डिलीट केले जायचे.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा - Inside Photos
बातम्या आणखी आहेत...