आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos Of Most Secret Country North Korea

जगासाठी कायम गूढ ठरलेल्या नॉर्थ कोरियाचे INSIDE PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफर- थॉमस वॅन हाउत्रेवे, स्थळ फायरिंग प्रॅक्टिसदरम्यान लोडेड पिस्तुलासह महिला, प्योंगयांगमधील 2007 चा फोटो. - Divya Marathi
फोटोग्राफर- थॉमस वॅन हाउत्रेवे, स्थळ फायरिंग प्रॅक्टिसदरम्यान लोडेड पिस्तुलासह महिला, प्योंगयांगमधील 2007 चा फोटो.
नॉर्थ कोरियाबाबत फार माहिती असणारे अत्यंत मोजके लोक आहेत. तसे पाहता हुकूमशाही असलेल्या या गूढ देशामध्ये प्रवासाची फार लोकांना परवानगी नसते. एवढेच नाही तर, या हुकूमशहासाठी काम करणाऱ्यांचा असाच प्रयत्न असतो की, जगाने त्यांच्या देशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहावे ज्या दृष्टीकोनातून त्यांना त्यांचा देश दाखवायचा असेल. अनेकदा या देशाचे असे फोटो समोर सादर केले जातात, ज्यातून अतिशयोक्तीची झलक दिसते.

मात्र या देशाबाबत माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. शिकागो येथील कोलंबिया कॉलेजमध्ये 'नॉर्थ कोरियन पर्सपेक्टिव्ह' नावाने एक प्रदर्शन सुरू आहे. याठिकाणी त्यांना नॉर्थ कोरियाबाबत माहिती मिळवण्याची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

रिपोर्टनुसार, प्रदर्शनामध्ये नॉर्थ कोरियाची सरकारी वृत्तसंस्था केसीएनएद्वारे हे फोटो उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नॉर्थ कोरियाच्या भेटीदरम्यान पर्यटकांना जे फोटो काढण्याची परवानगी देण्यात आली तेच हे फोटो आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या देशातील काही आणखी Photo