आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos Of Richest Bill Gates From Bedroom To Bathroom

अब्जाधिश बिल गेट्स यांच्या आलिशान बेडरूम ते चकाचक बाथरूमपर्यंतचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अब्‍जाधीशांची संख्‍या सातत्‍याने वाढतच चालली आहे. आता या लोकांच्‍या लक्‍जरी लाईफस्‍टाईलचा लुकही पाहायला मिळतो. यांचे घरही लक्‍जरी रिसोर्टसारखे असते. मग तो मुकेश अंबानींचे अँटीलिया असो वा सिंघानियांचा जे के हाऊस किंवा विजय मल्‍ल्‍या यांचा गोवा व्हिला.
लोकांचे डोळे दिपतील असे या सर्वांचे घर आहेत. या घरापैकी एक आहे, जगातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍तींमध्‍ये समावेश असलेले मायक्रोसॉफ्टचे प्रमूख बिल गेट्स यांचे घर. जगात श्रीमंतीमध्‍ये पहिल्या क्रमांकावर असलेल्‍या या व्‍यक्‍तीकडे सप्‍टेंबर 2012पर्यंत 6600 कोटी डॉलरची संपत्ती होती.
तसं पाहिलं तर बिल गेट्स यांचे जगात अनेक ठिकाणी बंगले आहेत. मात्र, वॉशिंग्‍टनचे अल्‍ट्रा लक्‍जरी घरात राहणे त्‍यांना आवडते. सुमारे 66 हजार वर्गफूटमध्‍ये बनलेल्‍या या घरात एकापेक्षा एक अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे या घराला Xanadu 2.0 या टोपणनावानेही ओळखले जाते.
पृथ्‍वीवर स्‍वर्गासारखी सुविधा देणा-या या घराची किंमत सुमारे 150 मिलियन डॉलर इतकी आहे. आकाशातून गेट्स यांच्‍या घराकडे पाहिल्‍यास ते एखाद्या शहरासारखे वाटते.
मायक्रोसॉफ्ट प्रमूखांच्‍या या घरात सात मोठे बेडरूम, 24 बाथरूम्‍स, सहा स्‍वयंपाक घर, सहा फायरप्‍लेस, 11500 वर्गफूटमध्‍ये कुटुंबियांसाठी खासगी क्‍वार्टर आणि 2100 वर्गफूटात लायब्ररी बनवण्‍यात आली आहे. गेट्स यांचे हे घर 92 फूट लांब आणि 63 फूट उंच आहे.
लक्‍जरी कारचे शौकिन असलेल्‍या गेट्स यांनी घरात 3 गॅरेज बनवले आहेत. यापैकी एका गॅरेजमध्‍ये 6300 वर्गफूट क्षेत्रात 10 कार उभ्‍या करण्‍याइतकी जागा आहे. मनोरंजनासाठी 20 लोकांना बसण्‍याची क्षमता असलेले शानदार थिएटर आहे.
गेट्स यांच्‍या आलिशान घरात गेल्‍यानंतर सर्वात प्रथम एक मोठे रिस्‍पेशन हॉल लागते. यामध्‍ये सुमारे 150 लोक बसून जेवण करू शकतात तर 200 लोकांबरोबर कॉकटेल पार्टीही होऊ शकते.
जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्‍या या घरात अंडरवॉटर म्‍युझिक सिस्टिमसहित स्विमिंग पूल आहे. 2500 वर्गफुटात जिम आणि 1000 वर्गफुटात डायनिंग रूम बनवण्‍यात आले आहे.
पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा जगातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍तीच्‍या घरातील आलिशान नजारा...