आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याने मढवलेल्या महालात राहतात येथील सुल्तान, पाहा आतील PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुनेईतील सुल्तान हसनल बोलकिया यांचा सोन्याने मढवलेला महल... - Divya Marathi
ब्रुनेईतील सुल्तान हसनल बोलकिया यांचा सोन्याने मढवलेला महल...
इंटरनॅशनल डेस्क- ब्रुनेईचा सुल्तान हसनल बोलकियाची ओळख जगातील सर्वात श्रीमंत सुल्तानांपैकी एक आहे. हसनल यांच्याकडे 1363 अब्ज रुपयेची संपत्ती आहे. जगात हसनलपेक्षाही श्रीमंत सुल्तान आहेत, बिजनेसमॅन आहेत. मात्र, संपत्ती दाखविण्याचे जे कौशल्य त्याच्याकडे आहे ते कोणाकडेच नाही. या सुल्तानाकडे जवळपास 7000 गाड्यांचा ताफा आहे. तसेच सोन्याचे विमान सुद्धा आहे. कधी होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती....
 
- सुल्तान हसनलला मिळणारा पैसा तेल साठा आणि नैसर्गिक गॅसमधून येतो.
- फोर्ब्सच्या माहितीनुसार, 2008 मध्ये हसनलची संपत्ती 1363 अब्ज रुपये इतकी होती. 
- फोर्ब्सच्या मॅगझीननुसार, 2009 नंतर त्याच्या संपत्तीत विशेष वाढ झाली नाही.
- याचे मागे जागतिक मंदीसोबतच ब्रुनेईतील पारंपारिक पद्धतीची अर्थव्यवस्था हे कारण मानले जाते. 
- 1980 पर्यंत सुल्तान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, 1990 पासून हे टायटल अमेरिकी बिजनेसमॅन बिल गेट्स यांच्यावर नावावर गेले.
 
इंग्लंडमध्ये घेतलेय उच्च शिक्षण-
 
- 15 जुलै 1946 रोजी ब्रुनेई टाऊन येथे त्यांचा जन्म झाला. 
- त्याचे नाव सुल्तान हाजी हसनअल मुईज़द्दीन वदाउल्लाह इब्नी अल महरूम सुल्तान हाजी ओमरअली सैफुद्दीन साअदुलखैरी वदीन ऊर्फ ब्रुनेईचे सुल्तान असे आहे.
- क्वालालंपूरच्या व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. 
- इंग्लंडच्या रॉयल मिलिटरी अकॅडमीत त्यांनी उच्च् शिक्षण घेतले.
- आयलँड ऑफ बोर्नियोमध्ये वसलेला ब्रुनेई हा छोटा, तरीही श्रीमंत देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त 4 लाख 15 हजार आहे.
- लॉस एंजलिस येथील हॉलीवूड ता-यांमुळे चर्चेत असलेल्या बेव्हर्ली हिल्स हॉटेलचे ते मालक आहेत.
 
सोन्याने मढवलेला 2387 कोटी रूपयांचा पॅलेस-
 
- सुल्तानचा आलिशान पॅलेस, लग्झरी कार्सचे कलेक्शन आणि प्रायवेट जेट जगभरात प्रसिद्ध आहे. 
- त्यांचा इस्ताना नुरुल इमान पॅलेस 20 लाख स्क्वेयर फूटांत पसरला आहे. 2387 कोटी रूपयांचा हा पॅलेस 1984 मध्ये बांधला गेला. 
- 1788 खोल्याचा हा पॅलेसचा घुमट 22 कॅरेट सोन्याने मढवलेला आहे. यात 257 तर फक्त बाथरूम आहेत.
- सुल्तानच्या या महालाला बीजिंगमधील फॉरबिडेन सिटीनंतर जगातील सर्वात दुसरा मोठा पॅलेस मानला जातो. 
- यात 110 कार्सचे गॅरेज, पोलोसाठी वापरल्या जाणा-या 200 घोड्यासाठी एयरकंडीशन्ड स्टड फॉर्म आणि 5 स्विमिंग पूल आहेत.

7000 लग्जरी कारचे कलेक्शन-

- सुल्तानाजवळ 7000 लग्झरी कार्सचे कलेक्शन आहे. या महागड्या गाड्यांची किंमत फक्त 341 अब्ज रुपये एवढी आहे.
- यात 600 रोल राईस, 300 फेरारी, 134 कोएनिगेग्स, 11 मॅक्लेरेन एफ1एस, 6 पोर्शे 962 एमएस आणि अनेक जग्वार गाड्याचा समावेश आहे.
 
जेट्सचे आहे कलेक्शन-
 
- ब्रुनेईचा सुल्तानकडे आपली प्रायवेट जेट बोईंग 747-400, बोईंग 767-200 आणि एयरबस ए340-200 आहेत. 
- बॉर्नरिच डॉटकॉमच्या माहितीनुसार, सुल्तानचे जेट बोईंग 747-400 एखाद्या पॅलेसला कमी नाही. 
- सोन्याने मढवलेल्या या जेटमध्ये लिविंग रूमपासून अनेक बेड रूम आणि लग्झरी सुविधा आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ब्रुनेईच्या सुल्तानाजवळ असलेले कार कलेक्शन आणि त्याच्या पॅलेससह त्याच्याशी संबंधित इंट्रेस्टिंग फॅक्ट्स...
 
(ब्रुनेई 23 फेब्रुवारी  रोजी आपला नॅशनल डे साजरा करत आहे. यानिमित्ताने आम्ही ब्रुनेईचा सुल्तानची लग्जरी लाईफस्टाईलबाबत स्टोरी देत आहोत.) 
बातम्या आणखी आहेत...