आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे जगातील सर्वात पॉवरफुल नेत्याचे घर, पाहा INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट विंगमध्ये असलेले ओवल ऑफिस... - Divya Marathi
वेस्ट विंगमध्ये असलेले ओवल ऑफिस...
इंटरनॅशनल डेस्क- पीएम नरेंद्र मोदी अमेरिका दोन दिवसाच्या दौ-यावर होते. सोमवारी (26 जून) रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत व्हाईट हाऊसध्ये भेट घेतली. मोदी मागील यूएस विजिट दरम्यान सुद्धा व्हाईट हाऊसचे पाहुणे बनले होते. मात्र, ट्रम्प यांनी मोदींसाठी विशेष डिनर आयोजित केले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत 26 देशांचे प्रमुख येथे येऊन गेले. मात्र, ट्रम्प यांनी कोणासाठीही विशेष डिनर ठेवले नव्हते. मात्र मोदींसाठी ते ठेवले यावरून अमेरिका भारताला किती जवळचा सहकारी मानते ते स्पष्ट होते. येथे आम्ही जगातील सर्वात पावरफुल देशाचा प्रमुखांचे म्हणजेच व्हाईट हाऊसचे आतील फोटोज दाखविणार आहोत. जाणून घ्या, व्हाईट हाऊसबाबत...
 
- व्हाईट हाऊसचे बांधकाम 1792 ते 1800 या दरम्यान झाले. 
- याचे डिजाईन आयरिश आर्किटेक्ट जेम्स होबानने तयार केले होते. 
- 1801 मध्ये थॉमसन जेफरसन हे व्हाईट हाऊसमध्ये शिफ्ट झाल्यानंतर त्याचा विस्तार केला गेला. 
- 1814 मध्ये युद्धादरम्यान ब्रिटिश लष्कराने वाईट हाऊस पेटवून दिले होते. 
- यानंतर 1815 ते 1817 या दरम्यान पुन्हा त्याचे बांधणी करण्यात आली. 
- यावेळी आर्किटेक्ट बेंजमिन हेनरीसोबत मिळून होबानने याचे डिझाईन तयार केले होते. 
- सध्याच्या व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्समध्ये एग्झीक्यूटिव रेसिडेन्स, वेस्ट विंग, ईस्ट विंग आणि इसेनहाउर एग्झीक्यूटिव ऑफिस बिल्डिंग आहे. 
- इसेनहाउर एग्झीक्यूटिव ऑफिस बिल्डिंगमध्ये प्रेसिडेंटचा स्टाफ तसेच वाईस प्रेसिडेंटसाठी आहे. 
- गेस्टला राहण्यासाठी ब्लेयर हाऊस बनविण्यात आला आहे. व्हाईट हाउसची एग्झीक्यूटिव रेजिडेंस सहा मजली आहे. 
- व्हाईट हाऊसचे दोन मजली बेसमेंट आहे तर बाकी चार मजले वर आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, व्हाईट हाऊसमधील आतील नाजाराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...