आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियात आहेत कठोर कायदे, फ्रान्‍सच्‍या फोटोग्राफरने कैद केले LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदीत नाकाला नाक लावून प्रणाम करतात. - Divya Marathi
सौदीत नाकाला नाक लावून प्रणाम करतात.
इंटरनॅशनल डेस्क- परंपरावादी असलेल्‍या सौदी अरेबियामध्‍ये फिरणे वाटते तेवढे सोपे नाही. विशेष म्‍हणजे तुम्‍ही जर अविवाहीत असाल नि जोडीने फिरत असाल तर तुम्‍हाला अत्‍यंत वाईट अनुभव येतील. मात्र, फ्रान्सचे फोटोग्राफर एरिक लॅफोर्ग येथे 15 दिवस राहण्‍यात यशस्‍वी ठरले. दरम्‍यान त्‍यांनी सौदी अरेबियामधील काही खास फोटो टिपले आहेत. गैर मुस्‍लिमांना मदत करण्‍यात येथील लोकांना फार रस नाही.
 
'पर्यटक व्हिसा मिळणेही कठीण'-
 
- लॅफोर्ग यांच्‍या मतानुसार, पर्यटक व्‍हिसा मिळवण्‍यासाठी आपल्‍याला लोकल ट्रॅव्हल एजन्सी किंवा कंपनीसोबत स्‍पॉन्‍सरशिप करावी लागते. 
- "हे काम फार कठीण आहे. या एजन्सी मक्का यात्रेकरूंकडून पैसे कमावतात."
- "आपण गैर मुस्‍लिम असाल, तर तुमच्‍या मदतीसाठी कुणी पुढे येणार नाही."
 
'येथे आहेत कठोर कायदे'-
 
- या छायाचित्रकाराने सांगितले की, "30 वर्षाखालील महिलांना येथे पती किंवा भावासोबतच बाहेर जाण्‍यास परवानगी आहे."
- "येथे अविवाहीत जोडप्‍याला फिरण्‍याची परवानगी दिली जात नाही."
-'' याशिवाय दारू पिणे, फोटोग्राफी, जुगार खेळणे व डुकराचे मास खाण्‍यास येथे बंदी आहे.''
- ''महिलांना बाहेर पडताना काळा पोषाख अनिवार्य आहे.''
 
पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....
 
बातम्या आणखी आहेत...