आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदीच्या लाटेत नाेकरी गेली, वेटर कामाच्या अुभवावरील पुस्तकाने दिली प्रतिष्ठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - आयुष्यातील लहान-मोठ्या समस्यांपुढे हार मानणाऱ्यांनी एकदा तरी जेम्स अॅडम्स यांच्याबाबतीत वाचले पाहिजे. जेम्स हे वॉल स्ट्रीटवरील प्रतिष्ठित कंपनीत उपाध्यक्ष होते. मंदीमुळे नाेकरी जाऊनही त्यांनी हार मानली नाही. एका रेस्तराँत ते वेटरचे काम करू लागले. आपल्या अनुभवांवर त्यांनी पुस्तक लिहिले. ते भलतेच लोकप्रिय झाले. त्यावरील चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे. जेम्स पुन्हा कॉर्पाेरेट क्षेत्रात परतले आहेत. पैशांसोबत नाव, प्रतिष्ठाही मिळवली. वाचा जेम्स यांची ही प्रेरक कथा...

घटना आहे २००९ ची. अवघी अमेरिका मंदीच्या विळख्यात होती. दररोज कुणाची ना कुणाची नोकरी जायची. यात वार्षिक लाखो रुपये कमावणारे जेम्स अॅडम्सदेखील होते. वॉल स्ट्रीटमध्ये हेज फंडचे उपाध्यक्ष जेम्स यांचा राजीनामा घेण्यात आला. दुसऱ्या नोकरीसाठी त्यांनी ठिकठिकाणी अर्ज केले, पण नकारच मिळाला. जवळचा सर्व पैसाअडका संपू लागला होता. मित्रांनीही तोंड फिरवले. पण वेक फॉरेस्ट विद्यापीठातून ग्रॅज्युएट व एमबीए झालेल्या जेम्स यांनी हार मानली नाही.

शेवटची आशा म्हणून ते वेफल हाऊस रेस्तराँमध्ये आले. ज्यांना कुठेच नोकरी मिळत नाही त्यांना काम देण्यासाठी वेफल हाऊस ओळखले जाते. येथे ‘जेल रिटर्न’ लोकांनाही नोकरी मिळते. वेफल हाऊसमध्ये मॅनेजरकडे जेम्स यांनी नोकरीची अपेक्षा व्यक्त केली. मॅनेजर एक महिला होती. तिने विचारले- मंदीने नोकरी हिरावून घेतली का? जेम्स यांनी मान डोलवली. उद्यापासून कामावर या, असे तिने सांगितले. पण तुमच्याकडे काळी पँट असली पाहिजे आणि येथे चोरी करणार नाही, अशा दोन अटीही घातल्या.

अशा रीतीने वॉल स्ट्रीटहून हकालपट्टी झालेले जेम्स वेफल स्ट्रीटवर आले. रेस्तराँत ते वेटर बनले. येथे त्यांना दर तासाला १४० रुपये आणि वरून टिपही मिळायची. त्यांची पत्नी त्यांना म्हणाली, तुम्हाला वेडं लागलंय का? वेटरचेे काम करणार? जेम्स मात्र गप्प राहिले. पहिल्या दिवशी त्यांना मुख्य आचाऱ्याची बोलणी खावी लागली. उष्टी सांडलेली टेबले त्यांच्याकडून स्वच्छ करून घेतली जाऊ लागली. पण जेम्स काम करत राहिले. सहा महिने ते तेथे राहिले. त्यांना दररोज ग्राहकांच्या नवनव्या नमुन्यांना ताेंड द्यावे लागायचे, सहकाऱ्यांचा कहरही वेगळाच. अनेक जण तर जेल रिटर्न होते. हेच अनुभव ते लिहित गेले आणि त्याला पुस्तकाचे रूपही दिले. त्याचे नाव ठेवले वेफल स्ट्रीट. आता जेम्स पुन्हा फायनान्सच्या जगात परतले आहेत. त्यांना चांगले पॅकेजही आहे. पण आता ते साधेसुधे आयुष्य जगतात. लोकांना निवृत्तीसाठी बचत व गुंतवणुकीचे सल्ले देतात. आणि हो, वेफल हाऊसच्या जुन्या सहकाऱ्यांना मोफत गुंतवणुकीच्या टिप्सही देतात.
बातम्या आणखी आहेत...