आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांच्या इन्स्टाग्राम सेलिब्रिटीवर रागवले लोक, जाणून घ्या का ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्स्टाग्राम सेलिब्रिटी आणि लाईफस्टाइल ब्लॉगर सजाना आर्पला सध्‍या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. - Divya Marathi
इन्स्टाग्राम सेलिब्रिटी आणि लाईफस्टाइल ब्लॉगर सजाना आर्पला सध्‍या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
इंटरनॅशनल डेस्क - इन्स्टाग्राम सेलिब्रिटी आणि लाईफस्टाइल ब्लॉगर सजाना आर्पला सध्‍या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक 21 वर्षांच्या या सेलिब्रिटीने इन्स्टाग्राम अकाउंटवर इंडोनेशिया दौ-याच्या छायाचित्रांसोबत प्रेरणादायी कोट्स लिहिले. हे कोट ब-याच लोकांना आवडले नाही. आणि त्यांनी सजानाला बजावले,की तू प्रेरणा द्यायला पात्र नाही. करण तू स्वत: खूप फिरत असते आणि लक्झरियस हॉटेलमध्‍ये दिवस घालवते. लोकांनी केल्या या टीका टिप्पण्‍या...
- न्यू साऊथ वेल्सची सजानाचे इन्स्टाग्रामवर 12 लाख फॉलोवर्स आहेत.
- नुकतेच तिने ट्रॅव्हलिंग फ‍िलोसॉफी मालिका सुरु करण्‍याचा निर्णय घेतला.
- यासाठी ती इंडोनेशियाच्या बालीत पोहोचली व आपले छायाचित्रे अपलोड केले.
- तिने येथील लक्झरियस विला अरियाना गांद्रे हॉटेलमधून बिकिनीतील छायाचित्र अपलोड केले.
- तिने फोटो ओळीत लिहिलेे, माझ्या मते माणसाला प्रवासामधून खूप शिकायला मिळते.
- येथे कोणताही वर्ग, रचना किंवा पुस्तक नाही. मात्र जे धडे तुम्ही शिकता, ते कोणत्याही शाळा-कॉलेजमध्ये शिकण्‍यापेक्षा खूप महत्त्वाचे असतात.
ब्लॉगरचे कडक शब्दात प्रत्युत्तर
- सजानाने लोकांनी विचारलेल्या प्रश्‍नाना उत्तर देताना लिहिले, ब-याच लोकांना माझे विचार, सुंदर विला आणि बिकिनी पाहवत नाही.
- मी केवळ हे म्हणून इच्छिते, की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडींविषयी लेखन व पोस्ट करण्‍याचे स्वातंत्र्य आहे.
- तुम्ही कुठे राहता आणि किती पैसे खर्च करता हे महत्त्वाचे नसते .
- या तुलनेत तुम्ही स्वत:ला व जगाला किती अनुभवता.
- मी वेगवेगळ्या संस्कृती पाहण्‍यासाठी खूप ठिकाणी फिरते. घाण अशा बिछान्यावर रात्र घालवली आहे व गरिबी पाहिली आहे. मात्र अशा प्रकारचे दौरे करायला मी ही पात्र आहे.
- मी तीन वर्षांपासून प्रवास करत असून आणि आताही शिकत आहे.
- एखाद्यावर त्याच्या कामावरुन टीकाटिप्पणी करणे चांगली गोष्‍ट नाही. उलट असं करणारा व्यक्ती संकुचित आहे हे कळते.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...