आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक पाळीचे फाेटाे डिलिट करण्यास रूपीचा विरोध, इन्स्टाग्रामला चूक कबूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो (कॅनडा) - भारतीय वंशाची रूपी कौर महिलांसाठी सकारात्मक कविता व प्रेरक लेखनातून भावना व्यक्त करते. मात्र, ती सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी तिने इन्स्टाग्रामवर एका मुलीचे मासिक पाळीतील छायाचित्र पोस्ट केले. त्यात मुलीच्या पायजम्याला ब्लीडिंगचे डाग दिसले. त्यामुळे इन्स्टाग्रामने फोटो डिलिट केला आणि त्यासाठी सामाजिक हिंसाचाराचे कारण दिले. रूपीने पुन्हा तसाच फोटो पोस्ट केला. त्यानंतर इन्स्टाग्रामने तीच प्रतिक्रिया दिली. रूपीने त्यास विरोध करत त्यांना मेल केला. छायाचित्रात चुकीचे असे काहीच नाही. हा महिलांचा हक्क आहे. इन्स्टाग्रामचे विचार पुरुषी मानसिकतेचे प्रतीक असल्याचे तिने ठणकावून सांगितले.
यानंतर रूपीने मासिक पाळीच्या कालावधीतील छायाचित्रांची मालिका तयार केली. सोशल मीडियावर महिलांकडून तिला मोठा पाठिंबा मिळाला. चुकीची जाणीव झाल्यानंतर इन्स्टाग्रामने रूपीची छायाचित्रे प्रसिद्ध केली. ितच्या गौरवार्थ २९ छायाचित्रांचा एक शार्ट व्हिडिओ तयार केला. इन्स्टाग्रामवरून छायाचित्र हटवल्यामुळे रूपीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे तिने आपल्या बहिणीसोबत मासिक पाळी दृश्यातून दाखवण्याचा संकल्प केला. समाजामध्ये महिलांच्या पाळीबाबत एवढा अवघडलेपणा का असावा, असा त्यामागचा एकमेव उद्देश होता. रूपी म्हणाली, आम्ही फोटो सिरीजमध्ये महिलांच्या पाळीतील टप्पे दाखवले. मासिक धर्म सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, हा केवळ लोकांना सांगण्याचा प्रयत्न आहे. नंतर इन्स्टाग्रामने मेल करून माफी मागितली. ही एक चूक होती. त्यात आता दुरुस्ती केल्याचे इन्स्टाग्रामने नमूद केले. त्या दिवसानंतर मी खूप आनंदी झाले, असे रुपी म्हणाली.
ही नैसर्गिक प्रक्रिया, त्यात चूक काय...
संपूर्ण पोशाखात असलेल्या मुलीचा फोटो तुम्ही डिलिट केला. केवळ रक्तस्राव दिसतो म्हणून तसे केले. हे तुमच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन आहे. विशेष म्हणजे महिलांच्या अश्लील छायाचित्रांबाबत हे मार्गदर्शक तत्त्व लागू होत नाही. माझे दर महिन्यास ब्लीडिंग होते. ही ईश्वराची देण आहे. त्यामुळे जीव जन्माला येतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात लाज कसली? - रूपी कौर
बातम्या आणखी आहेत...