आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ASEAN मध्ये तिरंग्याचा अवमान, जपानच्या PM नी पाहिले, मोदींनी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा वरील स्लाइडवर. - Divya Marathi
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा वरील स्लाइडवर.
क्वालालंपूर - मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये सुरू असलेल्या 13व्या आसियान-इंड्या समिटमध्ये तिरंगा उल्टा लावल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेत असताना हा प्रकार घडला. त्यावेळी दोन्ही नेत्यांच्या मागे त्यांच्या देशांचे झेंडे लावलेले होते. विशेष म्हणजे आबे यांचे लक्ष भारताच्या उलट्या झेंड्याकडे गेले आणि ते बराचवेळ त्याकडे पाहतही होते. पण मोदींनी नजर चुकूनही तिकडे गेली नाही. (आसियानमध्ये काय म्हणाले मोदी, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

कुठे लावलेले असतात हे झेडे?
कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिषदेत जेव्हा दोन देशांचे नेते एकमेकांना भेटतात त्यावेळी औपचारिक मिटींगच्या ठिकाणी त्या दोन्ही नेत्यांच्या देशाचे फोटो लावलेले असतात. आसियान समिटमध्येही असेच झाले. पंतप्रदान मोदी पोहोचण्याच्या आधी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे त्याठिकाणी पोहोचले. आबे यांचे लक्ष उलट्या तिरंग्याकडे गेले.

पीएम फक्त कॅमेरा पाहतात : काँग्रेस
मलेशियामध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते अखिलेश प्रतापसिंह यांनी ट्विट केले की, इंटरनॅशनल फोरममध्ये अशी चूक व्हायला नको. मोदी झेंडा पाहत नाहीत. त्यांचा कॅमेऱ्याकडे पाहण्यावर अधिक विश्वास आहे. हा प्रकार अपमानास्पद आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, परिषदेचे PHOTOS...