आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब देश! सरकारने लष्‍कराला दिली पगाराऐवजी बलात्कार करण्‍याची मुभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुबा - आफ्र‍िकेतल्या दक्षिण सूदान या देशाच्या सरकारने लष्‍कराला पगाराच्या बदल्यात महिलांवर अत्याचार करण्‍याची परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त ती मुले आणि अपंग व्यक्तींनाही जिवंत जाळू शकतात. संयुक्त राष्‍ट्रसंघाने(यूएन) प्रसिध्‍द केलेल्या मानव अधिकार अहवालात आश्‍चर्यचकित करणारे दावे करण्‍यात आली आहेत. गेल्या पाच महिन्यांमध्‍ये 1 हजार 300 पेक्षा जास्त महिलांवर बलात्कार झाला आहे.
यूएनच्या नव्या अहवालात काय आहे...
- यूएन अहवालात दक्षिण सूदानच्या दोन वर्षातील यादवी युध्‍दस्थितीवर प्रकाश टाकण्‍यात आला आहे.
- त्यानुसार, सरकारच्या विरोधकांना मदत करणा-या संदिग्ध व्यक्तीचा छळ केला जातो.
- त्यांना जहाजावरील कंटेनर्समध्‍ये दम कोंडून, झाडाला लटकवून फाशी किंवा शरीराचे तुकडे-तुकडे करुन मारले जाते.
- पालकांसमोर त्यांच्या मुलांवर बलात्कार केला जातो. आणि ते पाहण्‍यास त्यांना विवश केले जाते.
- लष्‍करातील काही सैनिक पगाराऐवजी मवेशियांना आपल्याबरोबर घेऊन जातात.
- वैयक्तिक संपत्ती चोरतात. महिला आणि मुलांना ओलिस ठेवतात.
महिलाने सांगितली आपबीती
- 'द गार्डियन' वृत्तपत्राला एका पीडित महिलेने सांगितले, की पाच सैनिकांनी मुलांसमोर तिच्यावर बलात्कार केला होता.
- 10 सैनिकांनी दुस-या महिलेला झाडाला बांधले. मग तिच्यासमोर 15 वर्षांच्या तिच्या मुलीवर अत्याचार करण्‍यात आला.
- एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की महिला सुंदर आणि जवान असेल तर तिच्यावर दहा सैनिक अत्याचार करतात.
- तसेच तो म्हणतो, आणि जर वयस्कर महिला असेल तर तिच्यावर 7-8 सैनिक अत्याचार करतात.
- दक्षिण सूदानमध्‍ये इतर देशांच्या तुलनेत मानव हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन होते, असे यूएन मानव अधिकार आयोगाचे प्रमुख जाएद राद अल-हुसेन यांनी सांगितले.
आणखी काय म्हणाले मानव अधिकार आयोगाचे प्रमुख
- बलात्कार आणि सामुहिक बलात्काराची आकडेवारी अहवालाचा एक भाग आहे.
- जगात मानवी हक्कांची सर्वात वाईट स्थिती दक्षिण सूदानमध्‍ये आहे. दहशतवाद आणि शस्त्रांच्या युध्‍दासाठी बलात्काराचा वापर केला जात आहे.
- हा अहवाल यूएनच्या गटाने दक्षिण सूदानमध्‍ये ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत राहून तयार केला आहे. येथील भयावह स्थितीस सरकार जबाबदार असल्याचे गटाने सांगितले आहे.
दोन वर्षांच्या यादवी युध्‍दात 50 हजार लोकांचा मृत्यू
- यूएनच्या एका वरिष्‍ठ अधिका-याने सांगितले, की येथील दोन वर्षाच्या यादवी युध्‍दात आतापर्यंत 50 हजार नागरिक मारली गेली आहेत.
- देशाचे राष्‍ट्रपती सल्वा कीर आणि उप राष्‍ट्रपती रीक माचर यांच्यामध्‍ये 2013 मध्‍ये राजकीय वाद सुरु झाला होता.
- यामुळे दोघांनाही पाठिंबा देणा-या समुदायामध्‍ये हिंसा सुरु झाली.
- या हिंसेत 50 हजार नागरिक मारली गेली. 22 लाख लोक विस्थापित झाली आहेत.
- तसेच पाऊस नसल्याने दुष्‍काळ स्थिती निर्माण झाली आहे.
कुठे आहे दक्षिण सूदान?
- दक्षिण सूदान जगातील सर्वात नवा देश आहे. हा देश आफ्र‍िका खंडात आहे.
- सहा देशांची सीमा लागून आहे. खनिज तेलाने हा देश समृध्‍द आहे.
- 2011 मध्‍ये सूदानपासून स्वातंत्र झाल्यानंतर येथे यादवी युध्‍द चालू आहे. या देशाचा सर्वात कमी वि‍कसित देशांमध्‍ये समावेश होतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दक्षिण सूदानशी संबंधित काही फॅक्ट्स...