आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा पॉवरफुल देशाचे मिशन झाले फेल, मग बनवले हे खतरनाक हेलिकॉप्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात खतरनाक व अमेरिकानिर्मित ‘व्ही-22 ऑस्प्रे’ हेलिकॉप्टर' - Divya Marathi
जगातील सर्वात खतरनाक व अमेरिकानिर्मित ‘व्ही-22 ऑस्प्रे’ हेलिकॉप्टर'
इंटरनॅशनल डेस्क- भारताच्या संरक्षण मंत्रालयाने लष्करासाठी 6 अपाचे अटॅक हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेतील बोईंग कंपनी बनवते. तसेच ही जगातील सर्वात जबरदस्त अटॅक हेलिकॉप्टर मानली जातात. आज ही हेलीकॉप्टर यूएस आर्मीशिवाय इस्त्रायल, इजिप्त आणि नेदरलँडची आर्मी याचा वापर करते. भारत फक्त असा पाचवा देश असेल ज्याच्याकडे अपाचे हेलिकॉप्टर असेल. असे असले तरी अमेरिकेजवळ याच्यापेक्षाही खतरनाक हेलिकॉप्टर ‘व्ही-22 ऑस्प्रे’ आहे , जे जगातील सर्वात पॉवरफुल हेलिकॉप्टर मानले जाते. एक मिशन फेल झाल्याने बनवले गेले ‘व्ही-22 ऑस्प्रे’ हेलिकॉप्टर...
 
- नोव्हेंबर 1979 मध्ये इराणी युवा विद्यार्थ्यांचा एक गट जबरदस्तीने अमेरिकेतील दूतावासात घुसला होता आणि तेथे उपस्थित 52 अमेरिकन लोकांना बंधक बनविले.
- इराणमध्ये शाहला हटविल्यानंतरचा तो काळ इस्लामिक क्रांतीचा होता आणि हे विद्यार्थी इराणी क्रांतीचे समर्थक होते.  
- अमेरिकेने त्यांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन ईगल क्लॉ’ चालवले होते. ज्याच्यासाठी 8 हेलिकॉप्टर तेहरानला पाठवली गेली मात्र अमेरिकेचे हे मिशन फेल झाले. 
- यातील 4 हेलिकॉप्टरची इंजिन खराब झाली होती तर एक हेलिकॉप्टर इराण क्रांतीकारींनी उडवून दिले होते. यामुळे अमेरिकेचे हे मिशन फेल झाले आणि अमेरिकेची लाजीरवाणी स्थितीचा सामना करावा लागला.  
- मात्र, 21 जानेवारी, 1981 रोजी बंधक बनवलेल्या सर्व नागरिकांना सोडून दिले. हे लोक सुमारे 14 महिन्यानंतर जर्मनीत पोहचले आणि नंतर अमेरिकेत पोहचले. मात्र त्यापुर्वी अमेरिकेने इराणवर लावलेले सर्व प्रतिबंध हटवावे लागले. 
- हे मिशन फेल झाल्यानंतर अमेरिकेने जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टर बनविण्यास सुरुवात केली, जे हेलिकॉप्टरच्या इतिहासात नवा अध्याय सुरु होणार होता. या हेलिकॉप्टरच्या निर्मितीनंतर जगभर अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनविण्यास सुरुवात झाली ज्यात रशियाचाही समावेश होता. 
 
का आहे एवढे पॉवरफुल-
 
- ‘व्ही 22 ऑस्प्रे’ हेलिकॉप्टरच्या निर्मितीचे काम 1989 मध्ये सुरु झाले. त्याचा संपूर्ण खर्च त्यावेळी 22 अब्ज रुपये एवढी होती. 
- याचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे रॉल्स रॉयस एई-1107 सी इंजिन होते, जे ड्राईव शॉफ्ट्सला कनेक्ट केले होते. ज्यामुळे गेयर बदलताच स्पीड वाढते.  
- हेलिकॉप्टरमध्ये लावलेली तीन इंजिनांचे ड्राईव्ह शॉफ्ट्सला जोडले गेल्याने एखादे इंजिन फेल झाले तरी इतर दोन इंजिन त्याचा वेग आणि क्षमतेत तीच गती पकडून ठेवू शकतात.
- हेलिकॉप्टरच्या बुलेटप्रूफ कॉकपिटमध्ये ग्लास नाईट व्हीजन आहे, ज्यामुळे पायलट अंधारातही लाईट ऑन नाही केले तरी पाहू शकतो.
- याशिवाय हेलिकॉप्टरच्या दोन्ही बाजूनी लावलेले पंखे हवेच्या दाबानुसार तीन दिशांना वळू शकतात ज्यामुळे हेलिकॉप्टरच्या स्पीडवर काहीही परिणाम होत नाही.
- त्याचे असे काही डिझाईन केले होते की, रेस्क्यू ऑपरेशनमध्ये शत्रूंच्या हेलिकॉप्टर किंवा इतर वेपन्सला टार्गेट केले जाऊ शकते. ही विमान एम-240 मशीन गन आणि एम-2 मशीनगन, ज्वॉईंट एयर-टू-ग्राउंड मिसाईल सुद्धा लेस आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ‘व्ही-22 ऑस्प्रे’ हेलिकॉप्टरची इतर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...