आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील आठवड्यात जगात काय घडले पाहा छायाचित्रांमधून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलँडच्या यसोथॉनमध्‍ये बँग फाय रॉकेट महोत्सवात रॉकेट प्रक्षेपित केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करतानाचे दृश्‍य - Divya Marathi
थायलँडच्या यसोथॉनमध्‍ये बँग फाय रॉकेट महोत्सवात रॉकेट प्रक्षेपित केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करतानाचे दृश्‍य
या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्वेटिव्ह पक्षाचे सरकार सत्तेत आले. येमेन, सीरिया आणि इराकमध्‍ये संघर्ष चालू आहे. सीरियात इस्लामिक स्‍टेटच्या दहशतवाद्यांनी ऐतिहासिक पालमीरा शहरावर नियंत्रण मिळवले असून ना‍गरिकांच्या हत्या सुरु केल्या आहेत. आता दोन हजार वर्षे जुने शहराला धोका पोहोचू नये याची सध्‍या काळजी लागली आहे.

सौदी अरेबियाच्या एका शिया मशिदीत मागील आठवड्यात आत्मघाती स्फोट झाला. हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे. सौदी अरेबियात शिया मशिदीत पहिल्यांदाच स्फोट घडवून आणला आहे. येमेन मध्‍ये हौती बंडखोरांसह संघर्ष चालू आहे. दुसरीकडे बुरुंडीमध्‍ये राष्‍ट्रपती अन्कुरुजीजाविरुध्‍द आंदोलन चालू आहे. यामुळे देशात हिंसा आणि तणावाचे वातावरण आहे. नेपाळमध्‍ये मागील महिन्यात आलेल्या भूकंपानंतर लोकांना मदत पोहोचवली जात आहे. चीन, को‍लंबियासह इतर देशांमध्‍ये नै‍सर्गिक आपत्तींचा कहर दिसतोय. फ्रान्सच्या कान शहरात कान चित्रपट महोत्सवाची धुम्म दिसली. महोत्सवात जगभरातील चित्रपट तारकांनी हजेरी लावली. येथे आम्ही छायाचित्रांमधून गेल्या दोन आठवड्यातील जगभरातील घडामोडी दाखवणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मागील आठवड्यातील जगभरातील घडामोडी...