बुधवारी पहाटेच याकूबला फाशी दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या बातमीची दखल घेतली आहे. संपूर्ण आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये याबाबत चर्चा आहे. अमेरिकेची बेवसाईट हफिंग्टन पोस्टच्या वृत्तात असे म्हटले आहे की, 1993 मुंबई सिरियल ब्लास्टचा आरोपी 54 वर्षीय चार्टेड अकाऊंटंट याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात फासावर लटकावण्यात आले.
हफिंग्टन पोस्टच्या या वृत्तात म्हटले आहे की, देशातील एक गट असाही होता, जो या फाशीच्या विरोधात होता. याकूब कुटुंबासह कशाप्रकारे कराचीहून भारतात परतला आणि त्याने गुप्तचर संघटनांना कशी मदत केली, याचा लेखाजोखा या रिपोर्टमध्ये आहे. स्फोटांनंतर तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या संरक्षणात होता.
स्फोटांची योजना आखणाऱ्यांमध्ये टायगर मेमन आणि दाऊद इब्राहीम यांची मुख्य भूमिका होती. ते दोघेही फरार असून टायगरचा भाऊ याकूब हा या प्रकरणी मुख्य आरोपी नसूनही त्याला फाशी दिली जात आहे, असा दावा या वेबसाईटवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना लिहिलेल्या पत्राच्या हवाल्याने करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय मिडियाचे कव्हरेज...