आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अफगाणिस्तान ते कझाकस्तान, असा साजरा झाला योग दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैवानमध्‍ये योग दिवसानिमित्त सूर्यनमस्कार करताना महिला - Divya Marathi
तैवानमध्‍ये योग दिवसानिमित्त सूर्यनमस्कार करताना महिला
आंतरराष्‍ट्रीय योग दिवस रविवारी(ता.21) 193 देशांमध्‍ये साजरा करण्‍यात आला. यानिमित्त देशोदेशी योगाचे आयोजन केले गेले होते. भारतात काही मुस्लिम संघटनांनी विरोध केल्याने आसनामध्‍ये सूर्य नमस्कार वगळण्‍यात आले होते. मात्र तैवानमध्‍ये सूर्य नमस्कार लोकांनी खूप उत्साहात केली. या व्यतिरिक्त अफगाणिस्तान, दक्षिण कोरिया, नेपाळ, फ‍िलिपाइन्स, ब्रिटन, केनिया, कझाकस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चीन, मलेशिया सारख्‍या देशांमध्‍ये योग कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.
पाकिस्तानमध्‍ये ही योग
पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्‍ये भारतीय उच्चायुक्ताने आंतरराष्‍ट्रीय योग दिवस साजरा केला. उच्चायुक्ताने या कार्यक्रमाच्या छायाचित्रांचे ट्विट केले. पाकिस्तानच्या कराची, इस्लामाबाद आणि लाहोरमध्‍येही अनेक ठिकाणी योगासने होणार होते. परंतु दहशतवाद्यांच्या धमकीमुळे आयोजन रद्द करण्‍यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील आयोजन करण्‍यात आलेल्या योग दिवसाचे काही निवडक फोटोज