आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकिलिक्स : असांजेची इंटरनेट लिंक इक्वॅडोरने गोठवली, क्लिंटन यांच्या विरोधात प्रचार सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - विकिलिक्सने इक्वॅडोरवर संस्थापक ज्युलियन असांजे यांचीच इंटरनेट जोडणी कापून टाकल्याचा आरोप केला आहे. सध्या असांजे यांनी इक्वॅडोरियन राजदूतावासातच लंडनला राजाश्रय घेतलेला आहे आणि त्याचा ग्रुप सध्या हिलरी क्लिंटन यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मोहिमेच्या प्रमुखांमार्फत हजारो ई-मेल्स प्रकाशित करत आहे.
असांजे येथील राजदूतावासात गेल्या चार वर्षांहूनही अधिक काळासाठी वास्तव्याला, राजाश्रयाला आहेत. लैंगिक गुन्ह्याच्या आरोपातील जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. विकिलिक्सच्या कालच्या इंटरनेट जोडणी कापल्याच्या आरोपानंतर मात्र ते एका ट्विटमध्ये म्हणाले की, इक्वॅडोरने ही जोडणी शनिवारी सायं. ५ वाजता तोडली आहे. आलेले कॉल्स, मजकूर आणि ई-मेल्स आता विकिलिक्सवरच सोडले असून, त्यांनी लगेच काल मला परत काही केलेले नाही. या राजदूतावासात फोन केला असता एका महिलेने फोन उचलला. ती म्हणाली की, मी कोणतीही माहिती उघड करणार नाही. याप्रकरणी इक्वॅडोरचे परराष्ट्रमंत्री यांनी एक लहानसे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना आता आणखीन एक चांगला मुद्दा हाताशी लागला असून ते आपल्या नेहमीच्या निवडणूक प्रचार रणनीतीअंतर्गत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर व्यक्तिगत हल्ले सुरूच ठेवतील.

उद्याच दोघांची अंतिम वादचर्चा आहे. यात हिलरींना विकिलिक्स प्रकरणातील ताज्या घडामोडी वा त्यासंबंधातील अडचणींच्या प्रश्नांना सामोरे जावे लागू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हेच मत डेव्हिड बर्डसेल, डीन ऑस्टिन मार्क्स स्कूल ऑफ पब्लिक अँड इंटरनॅशनल अफेअर्स अॅट ब्रुच कॉलेज यांनी देखील नोंदवले आहे. दरम्यान, अनेक महिन्यांपासून असांज राजदूत कार्यालयात आहे. अमेरिकेने त्याच्या हस्तांतरणाची मागणी केली आहे. अमेरिका ताब्यात घेण्याची असांजेला भीती आहे.

क्लिंटन यांच्या विरोधात प्रचार सुरूच
विकिलिक्सने त्यांच्याविरुद्ध सातत्याने जाहिरातबाजी, विधाने करणे सुरूच ठेवले आहे. अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात असतानाच त्यांनी क्लिंटन यांचा अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष प्रचार सुरूच ठेवला आहे. विकिलिक्स आपल्या ट्विटमध्ये इक्वॅडोरवर आरोप करून पुढे म्हणतो की, असांजे यांची इंटरनेट जोडणी अशातच कापली असून तेव्हाच ती कापली जेव्हा त्यावर क्लिंटन यांची पेड भाषणे छापून आली होती. ही सर्व भाषणे डेमोक्रॅटिक अमेरिकन अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी यांचे प्रचार प्रमुख जॉन पोडेस्टा यांच्या खात्यातून हॅक केलेली होती.
बातम्या आणखी आहेत...