आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदला घेण्यासाठी सायबर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या फ्रिजमधील वस्तू संपल्या आहेत व त्याची सूचना आपल्या किराणा माल विकणाऱ्या दुकानाला मिळाली आहे किंवा आपण दिवसभर काम केल्यामुळे थकलो आहोत व आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने घरी अंघोळीची सोय होत आहे, अशा बातम्या “इंटरनेट ऑफ थिंग्ज’मध्ये पाहायला मिळाल्यानंतर आपण अद््भुत भविष्याची कल्पना करायला लागतो. वास्तविक तशा सोयी आपल्या जीवनात आल्या आहेत. वायफाय हब, स्मार्ट टीव्ही, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर अशी मायक्रो प्रोसेसरवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेटवर्कचा हिस्सा आहेत. तसेच डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट कॉम्प्युटर हे इंटरनेटचे भाग आहेत. पण त्यात एक फरक आहे. कॉम्प्युटरच्या तुलनेत इंटरनेट ऑफ थिंग्जमधील गोष्टींची सायबर सुरक्षा अधिक तकलादू, कमकुवत आहे. तिचा दुरुपयोग करणाऱ्यासाठी दुष्ट हॅकर्सना अनेक वाटा खुल्या आहेत. सध्या हे डिव्हाइस पाच अब्जांच्या घरात गेले आहेत. अमेरिकेतील सिस्को या बड्या कॉम्प्युटर नेटवर्किंग कंपनीच्या मते, काही वर्षांत आणखी एक अब्जाहून अधिक डिव्हाइस इंटरनेटवर येतील.
हॅकरचे सर्वात आवडते काम म्हणजे इंटरनेटवर चालणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसला अगोदर ते आपला गुलाम बनवतात. या व्यवस्थेला बॉटनेट म्हणतात. या बॉटनेटला एका मशीन किंवा अनेक मशीनच्या समूहामध्ये एकत्र सोडलं जातं. (याला डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (डीडीओएस) असेही म्हणतात) त्यामुळे डिव्हाइस निरुपयोगी होते. एखाद्या कंपनीकडून खंडणी मिळवायची असेल तर अशा प्रकारे संघटित आक्रमण केले जाते. कोणताही देश असे आक्रमण करू शकतो. त्याचे ताजे उदाहरण द्यायचे म्हणजे अमेरिकेतले एक पत्रकार ब्रायन क्रेब्स यांचे देता येईल. ते स्वत: या प्रकारचे बळी ठरले आहेत. ब्रायन क्रेब्स इंटरनेटवरचे गुन्हेगार व डीडीओएस सर्व्हिस देणाऱ्यांचे अहवाल देणारे पत्रकार आहेत. ते क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जी माहिती चोरी केली जाते त्याचाही पाठपुरावा करणारे पत्रकार आहेत; पण ज्यांच्याविरोधात त्यांनी बातमीदारी केली होती त्यातून नाराज झालेल्या काहींनी त्यांच्या घरात हेरॉइन पाठवले व पोलिसांना याची आगाऊ खबरही दिली होती. गेल्या महिन्यात २० सप्टेंबरला क्रेब्स यांच्या वेब सर्व्हरवरही सर्वात मोठा डीडीओएस हल्ला करण्यात आला – ६०० ते ७०० अब्ज प्रति सेकंद म्हणजे इंटरनेटच्या संपूर्ण क्षमतेच्या तुलनेत अर्धा – हा हल्ला अनेक तास सुरू होता. सुरुवातीला मोफत सेवा देणाऱ्या अकामाई या फर्मने हे हल्ले परतवून लावले, पण त्यांनी हात टेकले. क्रेब्स यांना अखेर दुसऱ्या सर्व्हरची व्यवस्था करावी लागली व पहिला सर्व्हर शटडाऊन करावा लागला.
क्रेब्स यांच्या बाबतीत घडलेली घटना तशी दुर्मिळ असली तरी त्याचे व्यापक स्वरूप भविष्यात दिसू शकते. क्लाउड फेअर ही कंपनी वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी सेवा देते. या कंपनीचे प्रमुख मॅथ्यू प्रिन्स यांनी सलग दहा दिवस एक खर्व बिट्स प्रति सेकंद हल्ला होताना पाहिला आहे. अर्थात तो एका देशाने केला होता, त्याचे नाव त्यांनी सांगण्यास नकार दिला. १ ऑक्टोबरला क्रेब्स यांच्या कॉम्प्युटरवर हल्ला करणारा मिराई हा बॉटनेटचा सोर्सकोड एका अनोळखी व्यक्तीने जाहीर केला.
डीडीओएसवर हल्ला करण्यात तसा खर्च येत नाही. काही हजार डॉलरमध्ये असा हल्ला करता येतो, पण त्यांचा बचाव करण्याचा स्वस्त मार्ग नाही. क्रेब्सनी सांगितले की, एक वर्षाच्या पूर्ण सुरक्षिततेसाठी त्यांना दीड कोटी रुपयांचा खर्च येईल, असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही मुक्त पत्रकाराच्या आवाक्याबाहेरची ही रक्कम आहे. गुगलने प्रोजेक्ट शील्ड नावाचा एक नि:शुल्क प्रोग्राम तयार केला आहे. हा प्रोग्राम ऑनलाइन वर्तमानपत्रांसाठी तयार करण्यात आला आहे. गुगलचे म्हणणे आहे की, प्रोजेक्ट शील्डमुळे पत्रकार व संपादकीय मंडळांना सुरक्षा मिळालेली आहे. अंगोला या देशातील भ्रष्टाचार व राजकारणाबाबत बातम्या देणारे पत्रकार राफेल मोराइस यांना या प्रोजेक्ट शील्डमुळे सुरक्षा मिळालेली आहे.
२५ सप्टेंबरपासून क्रेब्स यांना या प्रोजेक्टचे संरक्षण देण्यात आले आहे, तरीही त्यांच्या वेबसर्व्हरवरचे हल्ले सुरूच आहेत. क्लाउड फेअरप्रमाणे प्रोजेक्ट गॅलिलिओ अमेरिकेतील सिव्हिल युनियन, कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट यांना सुरक्षा पुरवत आहे.
डिव्हाइस व नेटवर्कसाठी उत्तम सुरक्षा पुरवणे हे महत्त्वाचे आहे; पण त्याचा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने ते कोणी करत नाही. सरकारने एक सुरक्षा नियमावली जाहीर करावी व सर्व कंपन्यांना हा खर्च सामूहिक उचलावयास सांगता येईल. सध्या तरी असे काही होईल असे वाटत नाही.
बातम्या आणखी आहेत...