सिरियाच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या आयलानच्या मृतदेहाच्या फोटोने अक्षरशः संपूर्ण जगाला हादरवून सोडले. या फोटोतील निरागस शांतता कोणालाही स्तब्ध करून सोडणारी अशीच होती. पण या फोटोवरून सुरुवातीला अनेक वादही झाले. हा फोटो का काढला इथपासून ते अगदी फोटो प्रकाशित करायचा किंवा नाही अशा विविध प्रश्नांवरून चर्चा झडली होती.
आयलानचा हा सुन्न करणारा फोटो काढणारी फोटोग्राफर निलुफर देमिर हिने या फोटोबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. किनाऱ्यावर त्या निरागस बालकाला पडलेले पाहिले, त्यावेळी त्याच्यासाठी करण्यासारखे काहीही शिल्लक राहिले नव्हते. सर्व काही संपले होते. त्यामुळे त्या शांततेतील आक्रोश सर्वांसमोर व्यक्त करता यावा म्हणून आयलानचा फोटो काढल्याचे निलुफरने सांगितले.
निलुफर देमिर ही तुर्कस्तानच्या बोडरुम बीचवरून फेरफटका मारत होती, त्यावेळी तिला लाल टी शर्ट आणि निळ्या पँटमधील एक बालक त्याठिकाणी पडलेला दिसला. डॉगल न्यूज एजंसी साठी निलुफर काम करते. या परिसरात तिला एक असाइनमेंट होती, त्यावेळीच तिला आयलानचा हा मृतदेह आढळला होता.
एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये निलुफरने याबाबत भूमिका स्पष्ट केले. तिच्या बोलण्यामध्ये वारंवार येणारे शब्द पाहता, तिच्या मनावरही या घटनेचा खोलवर परिणाम झाल्याचे स्पष्ट जाणवते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या फोटोबाबत आणखी काय म्हणाली निलुफर...