आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Intimate Photos Capture The Relationship Between A Man And His Doll

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : महिलांचा तिरस्कार होता म्हणून बाहुलीबरोबरच थाटला संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्क आणि जेनी सामान्य दाम्पत्याप्रमाणे नाहीत. तरीही त्यांच्या भावना एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. दोघे एकमेकांबरोबर भरपूर वेळ घालवतात. पण या दोघांना वेगळं ठरवते ती एक बाब. ती म्हणजे जेनीही एक डॉल (बाहुली) आहे. डर्क (काल्पनिक नाव) ने जेनी नावाची ही डॉल चार वर्षांपूर्वी सहा हजार युरो (4.3 लाख ) मध्ये खरेदी केली होती. ती बाहुली चार वर्षांपासून डर्कबरोबर त्याच्या फ्लॅटमध्ये राहते. जेव्हा डर्क एकटा होता त्यावेळी जेनीने त्याच्या जीवनात आनंद आणला. डर्कही तिला अगदी आपल्या पत्नीप्रमाणे सांभाळतो. त्याने दिलच्या आकारातील एक पेंडेंट चेनही त्याला गिफ्ट केली आहे. जेनी ती गळ्यात घालते.

जेनीचा आवाज ऐकतो
जेनीही ही एक सेक्स डॉल आहे. डर्क तिच्याबरोबर संबंधही ठेवतो. तो दिवसभर तिच्याशी बोलत असतो. त्या डॉलचा आवाज ऐकतो असाही त्याचा दावा आहे. रिपोर्टनुसार डर्कला कोणत्या तरी महिलेने भावनिक धक्का दिला आहे. त्यामुळे तो सहसा सामान्य लोकांच्या संपर्कात येत नाही. डर्कला पहिल्या पत्नीपासून एक अपत्यही आहे. पण त्याच्या खऱ्या पत्नीबाबत मात्र काहीही माहिती नाही.

सिक्रेट जगात राहतो डर्क
फोटो जर्नालिस्ट सँड्रा हाइनने डर्क आणि जेनी यांच्या या नात्या विषयीती सिरीज केली आहे. त्यात त्याने या दोघांच्या नात्यावरून पडदा उघडला आहे. पण तिने या व्यक्तिची ओळख मात्र लपवली आहे. सँड्राने सांगितले की, डर्कच्या दररोजच्या जीवनातील घडामोडी ती कॅमेऱ्यात कैद करत होती. 44 वर्षाचा डर्क या डॉलला उचलून बाथरूममध्ये आंघोळ घालण्यासाठी नेतो, दोघे सोबत टिव्हीवर फुटबॉल मॅच पाहतात. त्याने आपल्या कुटंबाबातही या बाहुलीला सर्व सांगितले आहे. पाहुणे येताच मात्र तो ही डॉल लपवून ठेवतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, डर्क आणि जेनी (डॉल)चे PHOTO