आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investigators Find Suspected Russian Missile Parts On MH 17 Crash Site

MH 17 अपघात : घटनास्थळावर सापडले रशियन मिसाईलचे अवशेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेग - सुमारे वर्षभरापूर्वी कोसळलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या MH-17 या विमान अपघाताच्या कारणाचा शोध घेताना तपास पथकाला क्रॅश साईटवर रशियन मिसाईचे काही अवशेष सापडले आहेत. तपास करणाऱ्या पथकाने मंगळवारी हा दावा केला आहे. युक्रेनमध्ये गेल्यावर्षी जुलै महिन्यात विमान कोसळले होते.

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलचे हे अवशेष असल्याचे तपास पथकाने म्हटले आहे. हे मिसाईल रशियाने पुरवलेले असू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच युक्रेनमध्ये रशियाच्या बाजुने लढणाऱ्या बंडखोरांनी या मिसाईलचा वापर केला असण्याची शक्यताही तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

17 जुलै 2014 रोजी अॅमस्टरडॅम, नेदरलंड, क्वालालंपूर, मलेशिया मार्गावरील हे विमान मिसाईलद्वारे युक्रेनमध्ये पाडण्यात आले होते. बोइंग 777 या विमानातील सर्व 298 प्रवासी या अपघातात ठार झाले होते. मात्र विमानावर नेमका कोणी हल्ला केला याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. एकिकडे रशियन सरकार युक्रेनला यासाठी जबाबदार ठरवत आहे. पण तपासात रशियन बनावटीच्या मिसाईलचे अवशेष हाती लागल्याने पुन्हा रशियावर संशय बळावत आहे.
या संयुक्त तपास पथकामध्ये ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंग्लंड, अमेरिका, रसिया आणि नेदरलंड या देशांचे प्रतिनिधी आहेत. हे सर्व प्रतिनिधी हेगमध्ये तपास करून या अपघाताच्या कारणाबाबतचा अहवाल तयार करणार आहेत. ऑक्टोबरमध्ये अंतिम अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.