बीजिंग- अमेरिकेने खास तंत्रज्ञान वापरून अदृश्य होणारी विमाने (स्टिल्थ) तयार केली. मात्र, चीन आणि रशिया या देशांनी एकत्र येऊन या अमेरिकी विमानांचा माग काढून ती पाडण्याची क्षमता असलेला ‘शक्तिमान’ तयार केला आहे. ‘डिव्हाइन ईगल’ नावाच्या या विमानाचे वैशिष्ट म्हणजे अमेरिकेची जी विमाने रडारवर दिसणार नाहीत ती हा ईगल पाहू शकेल आणि तत्काळ पाडूही शकेल.
‘द इंडिपेंडंट’नुसार, गेल्या मे महिन्यात ‘डिव्हाइन ईगल’ची छायाचित्रे प्रकाशात आली होती. तज्ज्ञांनी ही विमाने म्हणजे स्टिल्थ विमानाचे शिकारी असल्याचे मत मांडले होते. त्यामुळे चीनचा हा ईगल आता अमेरिकी हवाई दलास आव्हान ठरू शकतो. गेल्या २५ वर्षांपासून रशिया आणि चीन अत्याधुनिक रडार विकसित करत आहेत. या देशांकडे असलेले रडार आता दूरवरील ढगांच्या गडगडाटासह स्टिल्थसारख्या अदृश्य विमानांचाही माग घेऊ शकते. हेच रडार डिव्हाइन ईगलमध्ये आहे. या विमानात असलेली खास प्रणाली विविध प्रकारच्या रेडिओ लहरी बाहेर टाकते.
त्यामुळे लक्ष्यावर अचूक मारा करणे सहज सोपे जाते. अदृश्य स्टिल्थही यातून सुटणार नाही. ते अगदी डोळ्यांसमोर आणून उभे केल्यासारखे स्पष्ट दिसेल.