आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलकडे 16.43 लाख कोटींची रोख, दुसरी कंपनी बनवली तरी ठरेल 11वी मोठी कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - जगातील सर्वात मोठी ५० लाख कोटी रुपयांची कंपनी असलेल्या अॅपलकडे २५६.८ अब्ज डॉलर म्हणजेच १६.४३ लाख कोटी रुपये रोख आहे. मंगळवारी मार्च तिमाहीची आकडेवारी जाहीर करताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी ही घोषणा केली आहे. या तिमाहीमध्ये कंपनीजवळील रोखीमध्ये ६४,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी कंपनीकडे १४.९१ लाख कोटी आणि ५ वर्षांपूर्वी ७.०५ लाख कोटी रुपये राेख होती. म्हणजेच पाच वर्षांत कंपनीच्या रोखीमध्ये १३३%  वाढ झाली आहे. कर भरावा लागू नये यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात पैसे अमेरिकेच्या बाहेर ठेवलेले आहेत. सीएफओ लुका मासेराती यांनी सांगितले की, १६.३ लाख कोटींपैकी १५.२९ लाख कोटी म्हणजेच ९३ टक्के रक्कम इतर देशांमध्ये ठेवलेली आहे.  

कंपनीने ३.२ लाख कोटी रुपयांचा लाभांश तसेच शेअर बायबॅकचा निर्णय घेतला आहे. आधी १६ लाख कोटी रुपये खर्च करण्याच निर्णय झाला होता. म्हणजेच मार्च २०१९ पर्यंत लाभांश व बायबॅकवर अॅपल १९.२ लाख कोटी रुपये खर्च करेल. उत्पादनावर मिळणारा जास्तीचा नफा यामुळे रोख पैशांत वाढ झाली आहे. अॅपलचा सरासरी नफा ३८ टक्क्यांच्या जवळपास आहे. 
 
१६.४३ लाख कोटींच्या रोखींचा अर्थ 
 { अॅपलकडील नगदीला जर कंपनी मानले तर ती जगातील ११ वी सर्वात मोठी कंपनी असेल.  
{ कॅशरिच इतर कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्टकडे ८ लाख कोटी, गुगलकडे ५.८ लाख कोटी आणि अॅमेझॉनकडे १.४ लाख कोटी रुपये नगदी आहे.  
{मोठे स्टार्टअप उबेरच्या व्हॅल्युएशनपेक्षा ३.५ पट तर टि्वटरपेक्षा २० पट जास्त रक्कम.
{ एकेकाळी ब्लॅकबेरीच्या मोबाइलला “किंग’ म्हटले जात होते. आता अॅपलजवळील नगदी
 ब्लॅकबेरीच्या मार्केट कॅपपेक्षा ५० पट जास्त आहे.  
{ ही रक्कम भारतातील चार सर्वात मोठ्या कंपन्या टीसीएस, रिलायन्स उद्योग समूह, एचडीएफसी बँक आणि आयटीसीच्या मार्केट कॅपपेक्षाही जास्त आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा...
> महसूल ४.६%, नफा ४.९% वाढला, आयफोनची विक्री १% घटली  
> ​भारतात विक्रीत विक्रमी वाढ, महसुलात २० % वाढ...  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...