आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराण अणुकरार अखेरच्या टप्प्यामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएन्ना - इराणच्या अणुकराराला अंतिम रूप देण्यासाठी जागतिक महासत्ता आणि इराण सोमवारी एकत्र आले. कराराच्या माध्यमातून १३ वर्षांचे आण्विक मतभेद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

गेल्या १५ दिवसांच्या वाटाघाटीत अणुकरार अस्तित्वात आणणे भविष्यात इराणच्या आण्विक हालचाली नियंत्रित ठेवण्यावर मुख्य भर देण्यात आला. इराणने मात्र आपला अणु कार्यक्रम शांततामय कार्यक्रमासाठी असल्याचा वारंवार उल्लेख केला आहे. आठवडाभरात करार अस्तित्वात येण्याची आशा आहे.
एप्रिल महिन्यात निश्चित केलेल्या कृती आराखड्यावरून मतभेद कायम आहेत. इराणला निर्बंध हटवण्यासाठी ठरावीक अवधी आणि संयुक्त राष्ट्राकडून पारंपरिक शस्त्रांवरील बंदी उठवण्यावर भर देत आहे. आम्ही दीर्घ पल्ला गाठला आहे. अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असून आम्ही त्याच्या निकट पोहोचलो असल्याचे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी इराणमध्ये रविवारी सांगितले. सुरुवातीपासूनचे टप्पे पाहिल्यास आपण कराराच्या जवळ आल्याचे जाणवते. त्याच वेळी सध्याची स्थिती पहिल्यास आणखी काही पावले उचलली जातील .
उचलणे आवश्यक असल्याचे वाटते. दरम्यान, जर्मन मुत्सद्द्याने करार निष्फळ ठरू शकतो, असा इशारा दिला आहे. तेहरानने अंतिम पाऊल उचलल्यास काही गोष्टी जलद घडू शकतात, असे सूत्रांनी रविवारी सांगितले.