आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीच्या इराणमधील राजदूत कार्यालयावर हल्ला, जाळपोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान- शिया धर्मगुरूला मृत्युदंडाची शिक्षा देणाऱ्या सौदी अरेबियाच्या विरोधात इराणी नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो निदर्शकांनी सौदीच्या राजदूत कार्यालयावर हल्लाबोल केला. जाळपोळ करण्यात आली.
इराणमधील दुसरे मोठे शहर असलेल्या मसहादमध्ये शनिवारपासूनच संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सौदीच्या राजदूत कार्यालयाला पेटवून दिले. निदर्शकांच्या हाती मृत्युदंड झालेल्या शिया धर्मगुरूंचे छायाचित्र पाहायला मिळाले. ५६ वर्षीय निम्र अल निम्र यांच्यासह ४७ जणांना मृत्युदंड देण्यात आल्याचे जाहीर झाल्याच्या काही तासांनंतर देशात निदर्शने करण्यास सुरुवात झाली.

राजदूत कार्यालयात घुसून काही निदर्शकांनी आग लावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले; परंतु सुरक्षा रक्षकांनी काही वेळात त्यांना इमारतीमधून बाहेर काढले. धर्मगुरूला पाठिंबा देणाऱ्या इराणने आपला दुटप्पीपणा जाहीर केला आहे. वास्तविक इराण दहशतवादाचे समर्थन करत आहे. म्हणजेच इराण गुन्हेगारीचा भागीदार आहे, असा आरोप सौदी अरेबियाने केला आहे.

सौदीचा निवाडा घोर निराशा करणारा : मून
सौदीच्या निवाड्यावर इराणकडून नाराजी व्यक्त होत असतानाच संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनीदेखील हा निवाडा घोर निराशा करणारा आहे, असे म्हटले आहे. अरब देशातील सर्व नेत्यांनी शांतता आणि स्थैर्य बाळगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणत्याही प्रकारची हिंसक प्रतिक्रिया व्यक्त होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, जेणेकरून प्रादेशिक शांततेला धक्का पोहोचणार नाही, असे मून यांनी म्हटले आहे.

‘ही तर आक्रमकता’
शिया धर्मगुरू निम्र-अल-निम्र यांना मृत्युदंड देऊन सौदीने आक्रमकता दाखवली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असे इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला अल सिस्तानी म्हणाले.

अनेक देशांत संताप
सौदीच्या मृत्युदंडावर सौदीच्याच पूर्वेकडील शियाबहुल प्रांतात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इराक, बहरिनमध्येही सौदीच्या विरोधातील सूर ऐकायला मिळू लागले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, मृत्युदंड आणि हल्लाही अयोग्यच : रुहानी