आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iran Leaders Website Calls SaudiArabia The White ISIS

शिया धर्मगुरूला मृत्‍यूदंड दिल्‍याने इराणने सौदीला म्‍हटले, \'व्हाइट ISIS\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - शिया धर्मगुरूला मृत्‍यूदंड दिल्‍यामुळे सौदी अरब आणि इराण यांच्‍यात तेढ निर्माण झाले असून, सौदीने इराणसोबतचा संबंध तोडण्‍याची घोषणा केली. दरम्‍यान, इराणनेसुद्धा सौदीला 'व्हाइट आयएसआयएस' असे संबोधले आहे. दहशतवादाला प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या आरोपाखाली सौदीने तीन दिवसांपूर्वी निम्र अल निम्र या शिया धर्मगुरूचा शीरच्‍छेद केला होता.
इराणच्‍या प्रमुख नेत्‍यांनी दिली धमकी, म्‍हटले - 'अल्‍हा करेल न्‍याय !'
- अयातुल्ला अल सिस्तानी यांनी निम्र यांना दिलेल्‍या शिक्षेचा निषेध केला. ते म्‍हणाले, ''याला जबाबदार असलेल्‍यांना अल्‍हा शिक्षा देईल.''
- शिया धर्मगुरू निम्र-अल-निम्र यांना मृत्युदंड देऊन सौदीने आक्रमकता दाखवली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
- सोबतच सौदीने अन्‍यायाच्‍या मार्गाने शहीद निम्र-अल-निम्र यांचे रक्‍त सांडले. लवकरच त्‍याचे त्‍यांना परिणाम भोगावे लागतील, असे म्‍हणत त्‍यांनी सौदीला 'व्हाइट आयएसआईएस' म्‍हटले.
- सौदीने 2016 च्‍या सुरुवातीला निम्र यांच्‍यासह 47 लोकांचा शीरच्‍छेद केला होता.
सौदीनेही तोडले इरणसोबतचे संबंध
- सौदीचे परराष्‍ट्र मंत्री अब्देल अल जुबेर म्‍हणाले, ''सौदीच्‍या सुरेक्षेला बाधा पोहोवण्‍याचा इराणला हक्‍क नाही. आमचा देश त्‍यांना तसा अधिकार कधीच देणार नाही.''
- त्‍यांनी इराणचे राजदूत आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना रियाध सोडण्‍याचे आदेश दिलेत.
- सौदीच्या राजदूत कार्यालयाला इराणमध्‍ये पेटवून दिल्‍यानंतर सौदीने इराणसोबतचे संबंध तोडले आहेत.
- सोशल मीडियातही याचा परिणाम दिसत आहे. लोक SaudiArabiaIsISIS, NimrBloodEndsKsa, DeathToAlSaud हॅशटॅगने आपला विरोध व्‍यक्‍त करत आहेत.

सौदीच्‍या विरोधातील काही निवडक ट्वीट्स
jasper ‏@_jasper___
White #ISIS - Black ISIS! #IS #Daesh #SaudiArabia #Saudi executions #SaudiArabiaIsISIS
anonymous ‏@AnonQC
Have the Saudi Kingdom’s rulers gone bonkers? Since the day they first put on the crown. #SaudiArabiaIsISIS
HiJaBiِ ‏@RaoBehan
Not to speak, not to raise hand and not to do anything for the cruelty and brutality going on is also part of cruelty #SaudiArabiaIsISIS
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...