आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iran Nuclear: No Guarantee Of Final Deal, Khamenei Says

इराणचे नाटक, निर्बंध हटवा, नंतरच स्वाक्षरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा - इराणने महाशक्तींसोबतच्या अणुकरारावर स्वाक्षरी करण्यासाठी नवी अट घातली आहे. राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी गुरुवारी म्हणाले, इराणवरील निर्बंध ज्या दिवशी मागे घेतले जातील त्याच दिवशी करारावर स्वाक्षरी केली जाईल. गेल्या आठवड्यात सहा महाशक्तींनी स्वित्झर्लंडच्या लाऊसानेमध्ये इराणला करारासाठी तयार केले होते. मात्र, त्या वेळी इराणवरील निर्बंध मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय झाला नव्हता. अमेरिकेने निर्बंध हळूहळू हटवले जातील, असे सोमवारी म्हटले होते.

इराण अण्वस्त्रनिर्मिती करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. मात्र, इराण शांततापूर्ण अणू कार्यक्रम राबवत असल्याचा दावा करत आहे. नव्या संमतीनुसार, ३० जूनपर्यंत सर्व पक्ष इराण अणू कार्यक्रमासंबंधी करारावर स्वाक्षरी करतील. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

राष्ट्राध्यक्ष रुहानी इराणच्या अणू तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, पाश्चिमात्त्य देश इराणवरील सर्व निर्बंध मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही करारावर स्वाक्षरी करणार नाहीत. अणुचर्चेत सहभागी सर्व पक्षांचा विजय व्हावा, असे आम्हाला वाटते.