आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या नौदल जवानांच्या अटकेवर अखेर इराण झुकले, सैनिकांची केली सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान - इराणने अमेरिकेसोबत नवीन पंगा घेण्याच्या अगोदरच बुधवारी अमेरिकेच्या १० नौसैनिकांची सुटका केली. मंगळवारी उशिरा रात्री सैनिक असलेले जहाज सागरी क्षेत्रात येताच त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इराण आणि अमेरिकी अधिकाऱ्यांदरम्यान चर्चेच्या अनेक नाट्यमय फेऱ्या झाल्या.
आण्विक कार्यक्रमावरून निर्बंध लागण्याची शक्यता लक्षात घेऊन इराणने हा निर्णय घेतला असावा, असे सांगितले जाते. जहाज इराणच्या सागरी क्षेत्रात घुसले होते. त्याबद्दल अमेरिकेने माफी मागितली होती. त्यामुळे सैनिकांना नौदलाच्या जहाजाला आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात सोडण्यात आले. दुसरीकडे मंगळवारी कुवेतहून बहरिनला जाणाऱ्या दोन जहाजांपैकी एकामध्ये अचानक तांत्रिक दोष निर्माण झाले होते. त्यामुळे ते इराणच्या सागरी क्षेत्रात भरकटत गेले होते. त्यानंतर इराणच्या तटरक्षक दलाने जहाजाला ताब्यात घेतले होते. त्यानुसार अमेरिकेचे नौदल सैनिक जाणूनबुजून इराणी भागात घुसले नव्हते. त्यामुळे त्यांची सुटका झाल्याचा दावा पेन्टागॉनने केला.
नौदल सैनिकांत एक महिला
नौदलाच्या सैनिकांत एक महिला आणि ९ पुरूषांचा समावेश आहे. त्यांची छायाचित्रेही जारी झाली आहेत. त्यानुसार इराणने त्यांना कसल्याप्रकारच्या यातना दिलेल्या नाहीत. परराष्ट्र मंत्री जॉन केरी व त्यांचे समकक्ष मुहम्मद जवाद जरीफ यांच्यातही चर्चा झाली होती. दोन्ही देशांचे राजकीय संबंध चांगले नाहीत.