आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणने बनवले ‘आत्मघाती ड्रोन’; समुद्र, जमिनीवर हल्ला शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान- इराणने आत्मघाती ड्रोन बनवले आहे. जमिनीवरून जमिनीवर किंवा समुद्रात हल्ला करण्यास सक्षम आहे. लांब पल्ल्याच्या या ड्रोनने चार क्षेपणास्त्रे वाहून नेली जाऊ शकतात. लक्ष्याच्या दिशेने डागल्यानंतर धडकून त्यास नष्ट करेल. त्यात तेही नष्ट होईल.

‘सॅगह’ असे या ड्रोनला नाव देण्यात आले आहे. ते अचूक मारा करणारे ड्रोन असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणचा अणुकार्यक्रम अद्यापही थांबलेला नाही. सीआयएच्या आरक्यू-१७० ड्रोनला डिसेंबर २०११ मध्ये पाडण्यात आले होते. इराणने अमेरिकेच्या तीन स्कॅनइगल ड्रोनला पकडले होते. अलीकडेच इराणने अमेरिकेत बनवण्यात येणारे एमक्यू-१ सी ड्रोनदेखील पकडण्यात आले होते. इराणी सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार नवीन ड्रोन सागरी निगराणीसाठी तयार करण्यात आले आहे. त्यामधून क्षेपणास्त्रे नेली जाणार नाहीत, परंतु गरज पडल्यास चार गाइडेड क्षेपणास्त्रे नेली जाऊ शकतील. त्या माध्यमातून स्फोटके पाठवली जाऊ शकतात.

त्या माध्यमातून आत्मघाती हल्ला करणेही शक्य आहे. जमिनीवरून जमिनीवर किंवा आकाशात अतिशय वेगाने लक्ष्य टिपण्याची या ड्रोनची क्षमता अाहे. विमान असो, जहाज किंवा जमिनीवरील वाहन, त्यांना उडवून देण्याची या ड्रोनची क्षमता आहे.

रात्रीही ‘नजर’
ड्रोनमध्ये रात्रीदेखील निगराणीसाठी अत्याधुनिक लष्करी कॅमेरा लावण्यात आला आहे. त्यामुळे अतिशय खराब सागरी परिस्थितीमध्येही हे ड्रोन पाठवता येऊ शकते.

अमेरिकी ड्रोनची नक्कल
इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने हल्ला करणारे हे ड्रोन अमेरिकेच्या अॅटॅक ड्रोनची हुबेहूब नक्कल असल्याचे म्हटले आहे. इराणने हे ड्रोन पाच वर्षांपूर्वी पकडले होते. गार्ड््सने त्याचे छायाचित्रही जारी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...