आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराण घटस्फोट झाले कठीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान- घटस्फोटांचे वाढते प्रमाण लक्षात घेता इराण सरकारने घटस्फोट कायद्यात आमूलाग्र बदल केले आहेत. आता यापुढे देशात परस्पर सहमतीने घटस्फोट घेता येणार नाही. संबंधित जोडप्याला आधी कायदेशीर समुपदेशन प्रक्रियेतून जावे लागेल. मात्र, समुपदेशन प्रक्रियेतून न जाणाऱ्या जोडप्याचा घटस्फोट अवैध मानला जाईल, असे सामाजिक कार्य अधिकारक्षेत्र विभागप्रमुख परनियाम घावाम यांनी म्हटले आहे.
मागच्या वर्षभरात इराणमध्ये घटस्फोटांचे प्रमाण २१ टक्के होते. येथील दर तिसरे लग्न अयशस्वी ठरले आहे. वर्ष २०१४ मध्ये इराणमध्ये ३० हजार जोडप्यांनी घटस्फोट घेतला असून त्यापैकी ९० टक्के घटस्फोट केवळ परस्पर सहमतीनेच झालेले आहेत. त्यामुळे नव्या कायद्यानुसार, आता परस्पर सहमतीपेक्षा समुपदेशातून समेट घडवून आणण्याला अधिक महत्त्व असेल, असे इराणमधील "शार्घ' दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे.