आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये 12 मॉडेल्सला 6 वर्षाची शिक्षा, प्रॉस्टिट्यूशनला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल नीलोफर बेहबूदी.... - Divya Marathi
मॉडेल नीलोफर बेहबूदी....
तेहरान- इराणमधील एका कोर्टाने प्रॉस्टिट्यूशनला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून 12 मॉडेल्सला सहा वर्षाची शिक्षा सुनावली. यात फॅशन एका ब्लॉगरचा समावेश आहे. सर्वांवर वेस्टर्न कल्चरला प्रोत्साहन दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर फॅशन इंडस्ट्रीत काम करण्यास बंदी घातली आहे. वर्षाच्या सुरुवातीला या मॉडेल्सना ऑनलाईन ग्लॅमरस फोटोज पोस्ट करण्याबाबत अरेस्ट केले होते. कोर्टाने म्हटले, मॉडेल्सचे काम इस्लामविरोधी...
- इराणी न्यूज एजेन्सी इलनाच्या माहितीनुसार, हे प्रकरण शिराज शहरातील आहे जेथे कोर्टाने 6 महिला मॉडेल आणि 4 पुरुष मॉडेल्सना शिक्षा सुनावली आहे.
- कोर्टाने सांगितले की, हे लज्जित करणारे फोटोज पोस्ट करून प्रॉस्टिट्यूशनला प्रोत्साहन देत आहेत. न्यूडिटीद्वारे या लोकांनी वेस्टर्न कल्चरला प्रमोट केले. हे इस्लाम विरोधी आहे.
- मॉडेल्सचे वकील तारावत यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या काही अशिलांना (मॉडेल्सना) देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे. ते पुढील दोन वर्षे पत्रकारिता, सरकारी नोकरी, फॅशन आणि फोटोग्राफी इंडस्ट्रीत काम करू शकणार नाहीत.
मेमध्ये केली होती अटक-
- तेहरानमधील मॉडेलिंग नेटवर्कवरील आठ मॉडेल्सना या वर्षी मे महिन्यात अटक केली होती. तसेच इतर 21 जणांविरूद्ध सुद्धा क्रिमिनल केस दाखल केल्या होत्या.
- दोन वर्षे या लोकांवर स्टिंग चालविल्यानंतर त्यांना अटक केली होती.
- आरोप होता की, या मॉडेल्सनी बिना हिजाबचे फोटो सोशल मीडियात खासकरून इंस्टाग्रामवर शेयर केले होते.
- आपल्या माहितीसाठी हे की, 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर येथील महिलांना हिजाब घालणे कायद्याने बंधनकारक आहे.
- ज्या मॉडेल्सना शिक्षा सुनावली आहे त्यात मलिका जमानी, नीलोफर बेहबूदी, डोन्या मोगादम, डाना निक, शबनम मौलवी, एल्नाज गुलरुख आणि हामिद फदेईचा समावेश आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोणत्या कोणत्या मॉडेेलला का दिली शिक्षा...
बातम्या आणखी आहेत...