आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iraq Army Hunts ISIL Fighters After Tikrit Breakthrough

तिक्रीतवरील विजयानंतर फौजा जिहादींच्या शोधात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिक्रीत - तिक्रीत शहराचा मध्यवर्ती भाग ताब्यात घेतल्यानंतर इराकी फौजांनी घातक जिहादींची शोधमोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी शहर जिहादींच्या तावडीतून मुक्त झाल्याचा दावा केला. मात्र, त्याचबरोबर अमेरिका प्रणीत लष्कराच्या मदतीने हवाई हल्ले सुरू ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
जिहादींचा काळा झेंडा काढून इराकचा राष्ट्रध्वज फडकल्यानंतर नागरिकांनी मंगळवारी जल्लोष केला. माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या मूळ गावी अद्याप शेकडो जिहादी दडून बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिक्रीतच्या मध्य, दक्षिण आणि पश्चिम भागावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची घोषणा अबादी यांनी सोशल मीडियावर केली. अमेरिका प्रणीत ६० देशांच्या फौजांच्या प्रवक्त्याने मात्र महिनाभराच्या या लढाईत विजयाचा आताच दावा करणे घाईचे ठरेल, असे म्हटले आहे. शहरातील काही भाग आयएसच्या ताब्यात आहे. त्यामुळे आणखी काम शिल्लक राहिले आहे, असे मेजर किम मिचेलसन यांनी वृत्तसंस्थेला ई-मेलवर सांगितले.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रशासनाचे उप राजदूत ब्रिट मक््गुर्क यांनी सध्याच्या घडामोडी इराक फौजांसाठी उत्साहवर्धक असल्याचे सांगितले. अनेक इमारतीखाली मृतदेह दडले आहेत. श्वानपथक त्यांचा शोध घेत आहे.