आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECALL: जेव्हा सद्दाम हुसेनच्या विरोधात 39 देशांनी छेडले होते युध्‍द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 नोव्हेंबर, 1990 - इराकला प्रत्युत्तर देण्‍यासाठी सौदी अरेबियाच्या वाळवंटात तैनात झालेले अमेरिकेचे फर्स्ट कॅलेव्हरी डिव्हिजनचे जवान. - Divya Marathi
4 नोव्हेंबर, 1990 - इराकला प्रत्युत्तर देण्‍यासाठी सौदी अरेबियाच्या वाळवंटात तैनात झालेले अमेरिकेचे फर्स्ट कॅलेव्हरी डिव्हिजनचे जवान.
इंटरनॅशनल डेस्क - 1990 मध्‍ये 2 ऑगस्ट रोजी इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेनने कुवेतविरोधात युध्‍द छेडले होते. या हल्ल्याच्या प्रत्युत्तर दाखल अमेरिकासह 38 देश हुसेनच्या विरोधात रणभूमीत उतरले होते. संयुक्त राष्‍ट्रसंघाने (यूएन) प्रथम इराकला कुवेतमधून सैन्य हटवण्‍यासाठी वेळ दिला. मात्र असे होताना न दिसल्याने मित्र राष्‍ट्रांच्या लष्‍कराने इराकवर हल्ला केला. या युध्‍दाला आखाती युध्‍द (गल्फ वॉर) या नावाने ओखळले जाते. इराकने का पुकारले होते कुवेतविरोधात युध्‍द...
- इराण व इराकच्या मध्‍ये 1980 पासून चाललेल्या आठ वर्षांच्या युध्‍दात साथ दिल्याने कुवेतला आखाती युध्‍दाला सामोरे जावे लागले होते.
- इराणसोबत युध्‍दासाठी कुवेतने इराकला बरीच आर्थिक सहाय्य केले होते.
- युध्‍द संपताच इराक कर्जात बुडाले होते व या देशाने कुवेतला कर्ज माफ करण्‍यास सांगितले.
- कर्जमाफीवर काही होताना न दिसताच इराकने कुवेतवर हल्ला केला.
आखाती युध्‍दाचे घटनाक्रम...
2 ऑगस्ट, 1990 - इराकने कुवेतवर हल्ला केला. त्यावेळी इराकची सत्ता सद्दाम हुसेनच्या हातात होते.
2 ऑगस्ट, 1990 - युएनने ठराव संमत करुन कुवेतवर इराकच्या हल्ल्यांची निंदा केली.
6 ऑगस्ट, 1990 - युएनने हल्ल्यामुळे इराकवर अनेक प्रतिबंध घातले.
7 ऑगस्ट, 1990 - अमेरिकेचे राष्‍ट्रपती जॉर्ज एच. डब्ल्यू. बुशने ऑपरेशन डेझर्ट शील्ड सुरु करण्‍याचे आदेश दिले.
8 ऑगस्ट, 1990 - इराकने कुवेतवर कब्जा केला व आपला भाग असल्याचे घोषित केले.
25 ऑगस्ट, 1990 - यूएनने ठराव संमत करुन सैन्य कारवाईंवर प्रतिबंध लागू करण्‍यास मंजूरी दिली.
इराकच्या विरोधात युध्‍दाला मिळाली मंजूरी
29 नोव्हेंबर, 1990 - युएनने 15 जानेवारी, 1991 नंतर इराकविरोधात सैन्याचा वापर करण्‍यास मंजूर दिली.
16-17 जानेवारी, 1991 - अमेरिका व मित्र देशांनी मिळून इराकच्या विरोधात ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मची सुरुवात केली.
24 फेब्रूवारी, 1991 - इराकच्या विरोधात जमिनीवरील हल्ले सुरु केले.
27 फेब्रूवारी, 1991 - बगदाद रेडिओने घोषणा केली, की इराक युएनचा ठराव मान्य करेल.
स्वातंत्र झाला कुवेत
27 फेब्रूवारी, 1991 - कुवेतला इराकच्या नियंत्रणापासून स्वातंत्र झाला.
28 फेब्रूवारी, 1991 - इराकविरोधात मित्र राष्‍ट्रांचे हल्ले थांबवले गेले.
14 मार्च, 1991 - कुवेतचे शासक देशात परतले.
6 एप्रिल, 1991 - इराकने शस्त्रसंधी कराराच्या अटी मान्य केल्या.
आखाती युध्‍दाशी संबंधित काही फॅक्ट्स
- इराकविरोधात अमेरिका व 38 देशांचे आघाडी बनवण्‍यात आली होती.
- मित्र राष्‍ट्रांच्या सैन्यात 28 देशांचे 6 लाख 70 हजार सैनिक सहभागी होते. 4 लाख 25 हजार सैनिक एकट्या अमेरिकेचे होते.
- अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या अनुमानानुसार, आखाती युध्‍दात 4 हजार 130 अब्ज रुपये खर्च झाले होते.
- कुवेत, सौदी अरेबिया व इतर आखाती देशांनी निधी म्हणून 2 हजार 435 अब्ज रुपये दिले होते.
- दुसरीकडे जर्मनी व जपानने 1 हजार 82 अब्ज रुपयांचा निधी दिला होता.
- सीएनएनच्या वृत्तानुसार, युध्‍दात एक लाखांपेक्षा जास्त इराकी सैनिक मारले गेले होते.
- अमेरिकेचे 383 सैनिक मारले गेले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा आखाती युध्‍दाची काही छायाचित्रे...