आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या क्रूरतेचे PHOTOS, जमिनीवर झोपवून मारले होते 1700 लोकांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्‍ये टि‍क्रीतमध्‍ये 1700 लोकांची हत्या केली होती. - Divya Marathi
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्‍ये टि‍क्रीतमध्‍ये 1700 लोकांची हत्या केली होती.
इराकमध्‍ये 39 भारतीय बांधकाम मजूरांची हत्या केल्याचे वृत्त आहे. त्यांना इस्लामिक स्टेटच्या(आयएसआयएस) दहशतवाद्यांनी2014 मध्‍ये टिक्रीतमध्‍ये झालेल्या नरसंहारात अपहरण केले होते. या नरसंहारात 1 हजार 700 लोक मारली गेली होती. यात इराकच्या हवाई दलाच्या सैनिकांनी लक्ष्‍य करण्‍यात आले होते. इराक सरकारने यासाठी आयएसआयएसला जबाबदार धरले होते. हल्ला कसा यशस्वी केला...
- 12 जून 2014 रोजी आयएसआयएसने टिक्रितमध्‍ये स्पीशर कँपवर हल्ला केला.
- हा शिया इराकी हवाई दलाचा कॅंप होता. या हल्ल्यात 11 हजार सैनिक होते.
- आयएसआयएस बंडखोरांनी यात फक्त शिया व बिगरमुस्लिम सैनिकांना लक्ष्‍य केले.
- इराकीमधील राजकीय नेते मिशान अल जुबोरीने यांनी सांगितले, की कॅम्पचे अधिका-यांनी सैनिकांना 15 दिवस विश्रांती घेण्‍याचा आदेश दिला होता.
- सैनिकांना नागरिकांच्या कपड्यांमध्‍ये आपल्या कुटुंबीयांकडे जाण्‍याचा आदेश मिळाले होते.
- ते बगदादजवळील हायवेवर बसची वाट पाहत होते.
- या दरम्यान बसमध्‍ये बसून आलेल्या आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले.
- त्यांना अल कौसर अल रीएसिया क्षेत्रात(अध्‍यक्षीय राजवाडा) आणले गेले. येथे नरसंहार घडले.
वेबसाइटवर टाकले होते फोटो
- आयएसआयएसने आपल्या वेबसाइटवर या घटनेचे फोटोज व व्हिडिओही पोस्‍ट केले होते.
- यात दहशतवाद्यांनी लोकांचे शिरच्छेद केल्याचे व त्यांनी गोळ्या मारल्याचे फोटोज टाकले होते.
- ह्यूमन राइट वॉचच्यानुसार, या घटनेचे सॅटेलाइट इमेजमध्‍ये या भयानक युध्‍द गुन्ह्याचे ठोस पुरावे मिळाले.
- या घटनेत वाचलेल्या सैनिकांनी सांगितले, की त्यांना त्यांना जबरदस्तीने कॅम्प सोडायला सांगितले होते.
- इराकी लष्‍कराचे प्रवक्ते कासिम अत्ता यांनी सांगितले, की स्पीशर कॅम्पमधून 11 हजार सैनिक गायब झाले आहेत.
- यातील बहुतेकांना अध्‍यक्षीय महालजवळ हत्या करण्‍यात आली.
- 18 सप्टेंबर रोजी इराकचे मानव हक्क मंत्रालयाने बेपत्ता सैनिकांची संख्‍या 1 हजार 95 सांगितली. त्यांनी 1 हजार 700 आकडा अमान्य केला.
40 दहशतवाद्यांना मिळाली शिक्षा
- स्पीशर नरसंहारला आयएसने घडवून आणलेले सर्वात क्रूर कृत्य मानले जाते.
- 16 सप्टेंबरला या नरसंहारमधील 4 संशयितांना कुर्दिशांना अटक केले होते.
- यानंतर दोन संशयितांना 2015 मध्‍ये फिनलँडमधून अटक केले.
- काही संशयितांना आयएसआयएसच्या व्हिडिओमुळे ओळख पटली. ते 11 लोकांच्या हत्येत सहभागी होते.
- संशयितांच्या अटकेनंतर फे‍ब्रूवारी 2016 मध्‍ये या प्रकरणात 40 दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली.
- मात्र न्यायालयाने 7 लोकांचा पुराव्या अभावी सुटका केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)