आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iraqi Jet Accidentally Bombs Baghdad District, Killing At Least 12

इराकच्या लष्कराने स्वतःच्याच देशात टाकला बॉम्ब, 3 चिमुरड्यांसह 12 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकच्या एका लढाऊ सुखोई विमानातून सोमवारी चुकून स्वतःच्याच देशावर बॉम्ब टाकला गेला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन चिमुरड्यांचाही समावेश आहे. इराकच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. इराकच्या लष्कराचे विमान ISIS च्या दहशतवादी तळावर हवाई हल्ले करून परतत असताना ही दुर्घटना घडली. चुकून झालेल्या या दुर्घटनेत तीन मुले आणि दोन महिलांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 25 जण जखमी झाले आहेत.

शिन्हुआ या वृत्तसंस्थेने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, लढाऊ विमानाने दक्षिणपूर्व बगदादमध्ये हा बॉम्ब टाकला. यामध्ये सहा घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर आसपासच्या अनेक इमारती आणि वाहनांचे नुकसान झाले. या घटनेनंतर बचाव पथकाने लगेचच घटनास्थळी धाव घेतली आहे. ढिगा-खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. इराकच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखोई विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील पूर्व भागातील रहिवासी भागात हा बॉम्ब पडला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS