आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकचे बदनाम तुरुंग, कैद्यांना विवस्त्र करुन कुत्र्यांसमोर सोडायचे अमेरिकन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी(सीआयए) या संस्थेवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे आरोप करण्‍यात आले आहे. एका अहवालानुसार, सीआयएने अल कायदाचा संशयित दहशतवादी अबू जुबैद याला एक महिन्यापर्यंत 83 वेळा वॉटर बोर्डिंग छळ केले होते. मात्र यानंतरही त्याच्यावरील आरोप सिध्‍द करण्‍यात सीआयए अपयशी ठरले. जुबैदवर नऊ अकरा हल्ल्याचा कट रचणे आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्‍ये सहभागी होणे, अशा आरोपांखाली 2002 मध्‍ये त्याला अटक करण्‍यात आली होती. अमेरिकेच्या या संस्थेने मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यातील एक आहे अबू गरीब प्रिझन टॉर्चर. इराकच्या या बदनाम तुरुंगात सीआयए आणि अमेरिकन लष्‍कराने कैद्यांवर अमानवी अत्याचार केले. विवस्त्र करुन कुत्र्यांसमोर सोडून दिले जात असे...
- 2003 मधील इराक युध्‍दात अमेरिकन लष्‍कर आणि सीआयएच्या अधिका-यांनी इराकच्या अबू गरीब तुरुंगात कैद्यांचे प्रचंड छळ केले.
- 2003 मध्‍ये अॅमिनेस्टी इंटरनॅशनल आणि असोसिएटेड प्रेसच्या अहवालात हा गौप्यस्फोट करण्‍यात आला होता.
- सीआयएने कैद्यांचा शारीरिक, लैंगिक आणि मानसिक छळ केला.
- 2006 पूर्वी अमेरिकन कोलेशन आर्मी आणि इराक सरकार अबू गरीब तुरुंगाचा वापर करत होते.
- हे तुरुंग बगदादपासून 30 किलोमीटर अंतरावर 280 एकर क्षेत्रावर पसरले आहे.
- टॉर्चर स्कँडल दरम्यान तुरुंगात 3 हजार 800 कैदी होते.
- बहुतेक कैद्यांना तुरुंगाच्या आवारात बनवलेल्या तंबूत ठेवले जात होते. छळवणुकीच्या घटना सेल ब्लॉक 1 ए आणि 1 बी मध्‍ये व्हायच्या .
- स्कँडलमध्‍ये 11 अमेरिकन सैनिक दोषी आढळले होते. यातील सात सैनिक मेरीलँड येथील 372 लष्‍करी पोलीस कंपनीतील होती.
पुढे वाचा... छळवणुकीच्या प्रचंड भयावह पध्‍दतीविषयी