आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफान खान अभिनीत ‘नो बेड ऑफ रोझेस’वर बांगलादेशमध्ये बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - इरफान खान अभिनीत “नो बेड ऑफ रोझेस’ वादात अडकण्याची चिन्हे असून बांगलादेश सरकारने त्यावर बंदी घातली आहे. बांगलादेशचे मुस्तफा सारवर फारुकी हे चित्रपटाचे निर्माते आहेत.  बांगलादेशचे लेखक व चित्रपट निर्माते हुमायूं अहमद यांच्यावर आधारित हा चित्रपट असल्याची चर्चा बांगलादेश व भारतातील प्रसारमाध्यमांतून रंगू लागली आहे.
 
हुमायूं यांनी आपल्याहून ३३ वर्षे लहान तरुणीशी विवाह केला होता. हा विषय वादग्रस्त असल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला आहे. परंतु फारुकी यांनी हा दावा फेटाळला आहे. एवढेच नव्हे तर चित्रपटाच्या सुरुवातीला चित्रपटाची कथा वास्तवाशी संबंधित नसल्याचे सांगण्यात येणार आहे. बांगलादेशच्या जाझ मल्टिमीडिया, भारताच्या एस्के मूव्हीज आणि इरफान खानच्या आयके कंपनीने निर्मिती केली आहे.  
बातम्या आणखी आहेत...