आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत हाहाकार माजवून ‘इर्मा’ वादळ शांत, 24 तासांत वादळाचा वेग ताशी 185 वरून 120 किमीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडा- अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात हाहाकार माजवल्यानंतर २४ तासांनी इर्मा वादळ शांत झाले आहे. हे वादळ आता कॅटेगरी ३ मधून १ मध्ये आले आहे. त्यामुळे वादळाचा वेग ताशी १८५ वरून १२० किलोमीटरवर आला आहे. फ्लोरिडाच्या ४० लाख घरातील वीज गायब असून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कॅटेगरी ५ चे हे वादळ कॅरेबियन बेटावर ताशी २९७ किमी वेगाने धडकले होते. यामुळे बारबुडा, अँटिग्वा, सेंट मार्टिन, प्युर्टोरिकोसारख्या छोट्या बेटांवरील ९० टक्के इमारती नेस्तनाबूत झाल्या. 
 
मियामीत २८ लूटमारांना अटक, संचारबंदी लागू
- लूटमारीच्या घटनेनंतर पोलिसांनी मियामीत संचारबंदी लावली असून २८ जणांना अटक केली आहे. 
- इर्मामुळे वॉल्ट डिस्ने पार्क ४५ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदाच बंद. 
- इंकी रिसर्चनुसार, अमेरिका आणि कॅरेबियन देशांना ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान.
 
पाच बेटांवरील ९० टक्के इमारती उद्ध्वस्त, संपूर्ण क्युबात ५ सेमीपर्यंत पाणी
बुधवार- वेग ताशी २९७ किमी
अँटिग्वा, बारबुडा, सेंट मार्टिनमध्ये हाहाकार. ९० टक्के इमारती उद्ध्वस्त.
गुरुवार- वेग ताशी २८५ किमी
डोमिनिकन रिपब्लिक, हैती कैकसमधील ५ हजार घरे पडली.
शुक्रवार- वेग ताशी २२५ किमी
बहामास व क्युबात भीषण पूर
शनिवार- फ्लोरिडात महापूर
बातम्या आणखी आहेत...