आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसकडून प्रचारासाठी बालकाचा वापर, सोशल मीडियावरून प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत - आपल्या क्रौर्याचा ऑनलाइन प्रसार करणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला आता त्यांच्याच भाषेत उत्तरे मिळायला लागली आहेत. सिरियातील एका कार्यकर्त्याने रविवारी आयएसच्या एका छायाचित्रास रिट्विट करत आयएसला भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या परिणामांचा इशारा एका कॉमेंटच्या माध्यमातून दिला आहे. आयएसने काही दिवसांपूर्वी एका नवजात बालकाच्या शेजारी पिस्तूल, ग्रेनेड इत्यादी स्फोटके ठेवून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकले होते. हे नवजात बालक जगासाठी धोकादायक ठरेल, असा इशाराही त्यांनी या माध्यमातून दिला होता. दरम्यान, आयएसने त्यांच्या दहशतीचा प्रसार करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतल्याचे वृत्त असून हे छायाचित्रही याचा अभियानाचा भाग आहे. दुसरीकडे, सिरियातील सामाजिक कार्यकर्ते अल रकवी यांनी आयएसच्या याच छायाचित्राला रिट्विट करून हे बालक आयएससाठीच धोकादायक ठरेल, असा इशारा दिला आहे.
नवजाताचे छायाचित्र अपलोड
आयएसनेसोशल मीडियावर अपलोड केलेल्या छायाचित्रातील नवजात बालकाचे नाव "जरहा' असून वडिलांचे अबू आईचे ओम असे नाव आहे. सोबतच, त्याचे जन्म प्रमाणपत्रही अपलोड करण्यात आले आहे. हे बालक जगासाठी धोका ठरेल, अशी कॉमेंटही त्यावर आहे. दरम्यान, हे छायाचित्र आयएसचेच असेल की नाही, यावर शंका आहे. अॉस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय िवद्यापीठाचे दहशतवाद तज्ज्ञ डॉ. क्लार्क जोन्स यांच्या मते, हे आयएसकडून टाकण्यात आलेलेच छायाचित्र आहे.

आधीही केले आहेत अनेक फोटो अपलोड

आयएसच्या प्रचाराविरोधात जुलैपासून विशेष अभियान
आयएसच्याऑनलाइन प्रचार माेहिमेविरोधात ऑस्ट्रेलियाने विशेष अभियानाचे नियोजन केले आहे. ऑस्ट्रेलियाचे महाधिवक्ता जॉर्ज ब्रँडिस यांनी यासाठी १८ लाख अमेरिकन डॉलरचा निधीही जाहीर केला आहे. हे अभियान एखाद्या युद्धाप्रमाणेच असेल आणि जुलैपासून ते सुरू होईल. यासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम आयएसचा सोशल मीडियावरील प्रचार मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करेल. यासाठी गुगल, ट्विटर आणि फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचाही अभियानात समावेश करण्याचा सरकारचा विचार आहे.
ऑगस्ट २०१४ मध्येपोस्ट करण्यात आलेल्या या छायाचित्रात एके ४७ घेतलेल्या बालकास जिहादी म्हटले होते.

सिरियातील सामाजिक कार्यकर्त्याने आयएसच्या याच छायाचित्राला रिट्विट करून "धिस चाइल्ड विल बी रिस्क फाॅर यू' असे वाक्य लिहिले आहे.

सप्टेंबर २०१४ मध्येजारी या छायाचित्रात बालकाच्या आजूबाजूला आयएसचा ध्वज आणि ग्रेनेड दाखवण्यात आले होते.