आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन विमानाचे हवेतच तुकडे, एका मुलीचा मृतदेह सापडला 8 KM वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानाचे तूकडे-तूकडे झाले - Divya Marathi
विमानाचे तूकडे-तूकडे झाले
कैरो - इजिप्तमध्ये कोसळलेल्या रशियन एअरलाइन्सच्या एअरबस ए-321 चे हवेतच तुकडे झाले होते. असा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. हवेतच विमानाचे तुकडे झाल्यामुळे त्याचे भाग सर्वत्र विखूरले गेले. रशियन एअरलाइन्सचे एअरबस ए-321 हे विमान शनिवारी इजिप्तच्या सिनाई भागात कोसळून सर्व 224 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात 138 महिला, 62 पुरुष, 17 मुले आणि चालक दलाच्या सदस्यांचा समावेश होता.

रशियातील कोगलिमव्हिया या कंपनीचे हे विमान शर्म-अल-शेख शहरातून रशियाच्या सेंट पीटर्सबर्गकडे जात होते.
या दाव्यात किती दम
विमानाचे हवेतच तुकडे झाले, या दाव्याला दुजोरा मिळत आहे. कारण, रविवारी तपास आणि मदत पथकाला घटनास्थळापासून (सिनाईच्या अल-अरिश) आठ किलोमीटरवर एका मुलीचा मृतदेह सापडला.
दरम्यान, रशियाच्या सिरियातील हल्ल्यांच्या विरोधात आपण विमान पाडले, असा दावा इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेने केला होता. मात्र, संरक्षण अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित घटनेची अधिक छायाचित्रे..