आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IS Manual Advises Jihadis To Trim Their Beards, Wear Western Style Clothes

वेस्टर्न कंट्रीजमधील नव्या जिहादींनी वाढवू नये दाढी, ISISने काढला फतवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ISIS या दहशतवादी संघटनेने ऑनलाइन एक फतवा काढला आहे. ISIS मध्ये सहभागी होऊ इच्छीत असणार्‍या युवकांसाठी हा फतवा आहे. वेस्टर्न कंट्रीजमधील नव्या जिहादींनी दाढी वाढवू नये, असे या फतव्याद्वारे सांगण्यात आले आहे. सिक्युरिटी एजन्सीपासून स्वत:चे संरक्षण तसेच एकाकी हल्ला करण्‍यासाठी युवकांनी वेस्टर्न आउटफिट परिधान करावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

ISIS ने सांगितले, नव्या जिहादींची अशी असावी वेशभूषा...
- पीटीआयनुसार, ‘सेफ्टी अॅण्ड सिक्युरिटी गाइडलाइन्स फॉर लोन वोल्फ मुझाहिदीन’ या टायटल खाली ISIS ने 58 पानांचे ऑनलाइन मॅन्युअल काढले आहे.
- मॅन्युअलनुसार, लोन वोल्फ अटॅक (एकट्याने हल्ला करणे) करणार्‍या जिहादींनी दाढी वाढवू नये. नियमित शेव्ह करावे. थोडक्यात त्यांची वेशभूषा व केशभूषा ही ख्रिश्चियन्स सारखी असावी. यामुळे सिक्युरिटी एजन्सीचे अधिकारी देखील त्यांना ओळखू शकणार नाहीत.'

आणखी काय आहे ऑनलाइन मॅन्युअलूमध्ये?
- नॉन अरेबिक युवकांनी दाढी वाढवू नये. कुर्ता, मिसवाक (टूथपेस्ट) व इस्लामिक पुस्तके आपल्यासोबत बाळगू नये. ख्रिश्चियन्सप्रमाणे गळ्यात क्रॉस नेकलेस घालण्याची मूभा आहे.
- पासपोर्टवर मुस्लिम नाव असलेल्या युवकांनी गळ्यात क्रॉस घालू नये. तुमच्यावर संशय व्यक्त केला जाऊ शकतो.
- तुम्हाला परफ्यूमची आवड असेल तर मुसलमानांचे तेल किंवा इत्राचा वापर करू नये. याऐवजी अल्कोहलिक परफ्यूमचा वापर करावा.

घातपातावरील चर्चा (डिस्कशन) फक्त नाइटक्लबमध्ये करण्‍यात यावी. तिथे मोठ्या आवाजात म्युझिक सुरु असते. त्यामुळे तुमचे बोलणे कोणी ऐकणार नाही.

पुढील स्लाइडवर पाहा, ISIS चा सिम्बॉलिक फोटो...