आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसचे शिरच्छेदाचे सर्व व्हिडिओ बनावट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रित करण्यात आलेले - Divya Marathi
चित्रित करण्यात आलेले
मॉस्को- इराक मधीलदहशतवादी संघटना आयएसआयएसने (इस्लामिक स्टेट) अमेरिकेसह विदेशी नागरिकांचा निर्दयीपणे शिरच्छेद केल्याचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांत जारी झाले आहेत. हे सर्व व्हिडिओ बनावट असल्याचा दावा रशियन हॅकर्सनी केला आहे. "सायबर बरकुट' नावाच्या एका प्रो - रशियन हॅकर्स ग्रुपने हा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ओलीस ठेवलेल्या लोकांची निर्दयी हत्या केल्याचे हे व्हिडिओ "स्टेज्ड' (चित्रित करण्यात आलेले) आहेत. अमेरिकेचाही त्या चित्रीकरणात सहभाग आहे.
आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ रशियन हॅकर्सनी एक व्हिडिओ जारी केला आहे. मात्र, या व्हिडिओच्या प्रामाणिकतेची कोणतही पुष्टी होऊ शकलेली नाही. हॅकर्स ग्रुपनुसार "जॉन मॅकेन' यांच्या एका कर्मचाऱ्याचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हॅक केेल्यानंतर त्यातून आयएसआयएसद्वारे ओलिसांची निर्घृण हत्या केल्याचा स्टेज्ड व्हिडिओ मिळाला.
हॅकर्सनी सिनेटर्सना असा इशारादेखील दिला आहे की, पुढच्या वेळी ते जेव्हा विदेश दौऱ्यावर जातील तेव्हा त्यांनी गुप्त माहिती कागदपत्रे अजिबात सोबत ठेवू नये, असा इशारा दिला आहे. हॅकर्स ग्रुपने जारी केलेल्या या व्हिडिओत आयएसचा चर्चित चेहरा जिहादी जॉनप्रमाणे काळ्या पोशाखात एक दहशतवादी नारंगी जंपसूटमध्ये एक ओलीस नागरिक दिसतो. या व्हिडीओजसाठी अायएसची जागतिक पातळीवर प्रचंड निंदा झाली आहे.

जॉन मॅकेन कोण?
जॉनमॅकेन हे अमेरिकन सिनेटर असून सिरियामध्ये अनेकवेळा बड्या दहशतवाद्यांना भेटले आहेत. सोशल मीडियावर त्याची छायाचित्रदेखील पाहता येऊ शकतात. पश्चिमी मीडिया सातत्याने ती लपवण्याचा प्रयत्न करत असतो. इंटरनेटवर उपलब्ध फोटोमध्ये मॅकेन यांच्यासह आयएसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादीसह काही दहशतवादी एकत्र दिसतात.
बोको हरमचाही व्हिडिओ
आबुजा| दोनदिवसांपूर्वी दहशतवादी संघटना आयएसने नायजेरियातील दहशतवाद संघटना बोको हरम त्यांचा पार्टनर असल्याचे म्हटले होते. याआधी बोको हरमनेही पहिल्यांदाच शिरच्छेदाचा व्हिडिओ जारी केला होता. यात अायएसच्या लोकांचा वापर करून घेतल्याचे म्हटले होते.
रशियन हॅकर्सचा दावा
बातम्या आणखी आहेत...