आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसच्या हल्ल्यात 51 ठार, 14 सिरियन सैनिकांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस - सिरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने तुर्की बंडखोरांचा सूड घेण्यासाठी शनिवारी हल्ला केला. सिरियाच्या अल-बाब शहराजवळ झालेल्या हल्ल्यात ५१ जण ठार झाले. शुक्रवारी तुर्की बंडखोरांनी इसिसचे वर्चस्व असलेला हा परिसर आपल्या ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
 
अल-बाबपासून ८ किलोमीटर अंतरावरील सुसियानमध्ये हा हल्ला झाला. सिरियातील दुसरे शहर होम्समध्ये सैन्य व सुरक्षा दलाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात १४ सैनिक ठार झाले. सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने ही माहिती दिली. अल-बाबजवळील बंडखोरांच्या छावण्यांना दहशतवाद्यांनी उडवून लावले. हे ठिकाण तुर्कीच्या सीमेपासून २५ किलोमीटर दक्षिणेला आहे. उत्तर सिरियाच्या अलेप्पोमध्ये इसिसचे वर्चस्व राहिलेले आहे. तुर्कीने बंडखोरांच्या मदतीसाठी सैनिकांना पाठवले होते. 
बातम्या आणखी आहेत...