बेरूत - पश्चिमी सिरियाच्या होम्समध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी तलवारीने खुलेआम एकाजणाचा शीरच्छेद केल्याचे समोर आले आहे. जादू टोणा करत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. 'रक्का इज बीइंग स्लॉटर्ड स्लोली' या ट्विटर अकाउंटवर या प्रकाराचे PHOTO शेअर करण्यात आले आहेत.
फोटोंमध्ये काय?
एका फोटोमध्ये दहशतवादी एका व्यक्तिला गर्दीमध्ये लाथांनी मारहाण करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये एक मास्क घातलेला दहशतवादी मानेवर तलवारीने वार करत असल्याचे दिसते. सर्व फोटोंमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दीही पाहायला मिळाली आहे.
दुसऱ्याला ठेचून मारले
याच टि्वटर अकाउंटवर इराकच्या अल-अनबर प्रांतातील दुसऱ्या एका घटनेचे फोटोही जारी करण्यात आले आहेत. त्यात दहशतवादी बलात्कारातील एका आरोपीला शिक्षा देताना दिसत आहेत. त्याला गर्दीमध्ये दगडाने ठेचून ठार मारण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दोन्ही घटनांचे PHOTO...